Mahayuti Crisis  Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: कल्याण पुर्वमध्ये बंडाचा झेंडा! 'भाजप'च्या सुलभा गायकवाड यांना विरोध, शिंदेंचा शिलेदार अपक्ष लढणार

Maharashtra Assembly Election 2024: भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत बंडाचा झेंडा फडकवणार असल्याचा इशारा दिला आहे.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan East Assembly Election 2024: महायुतीत जागा वाटपानंतर इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत. कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गटातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उघडपणे बंडाचा इशारा दिला होता. सुलभा गायकवाड उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक विशाल पावशे हे देखील येत्या 25 तारखेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे हे दोन इच्छुक देखील विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे चर्चा आहे.

शिवसेना शिंदे गट व भाजपमधील वादामुळे कल्याण पूर्व हा मतदारसंघ कायमच चर्चेत राहिला आहे काही महिन्यांपूर्वी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचे घटना घडली. या घटनेनंतर शिवसेना भाजपा मधील संघर्ष चव्हाट्यावर आला. शिवसेना शिंदे गटाने कल्याण पूर्व या मतदारसंघावर दावा केला तर दुसरीकडे भाजपाने या मतदारसंघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड भाजपचे आहेत त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडेच राहील असे स्पष्ट केले होते.

शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड विधानसभा प्रमुख निलेश शिंदे उपशहर प्रमुख विशाल पावशे हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. भाजपने आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत बंडाचा झेंडा फडकवणार असल्याचा इशारा दिला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख विशाल पावशे हे येत 25 तारखेला अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, शहर प्रमुख महेश गायकवाड हे देखील बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. एकंदरीतच यंदा या बंडखोरीमुळे भाजपा उमेदवार सुलभा गायकवाड यांच्यासमोर मोठं आव्हान उभे ठाकणार आहेत. या बंडखोरांची समजूत काढण्याचे मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर उभा ठाकलं असून महायुतीतील वरिष्ठ नेते यांची समजूत काढतात का? या बंडखोरांचे भूमिका काय असणार? हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shinde Vs Dighe: ठाण्यात CM एकनाथ शिंदे विरूद्ध दिघे; शिंदेंना बालेकिल्ल्यात ठाकरे घेरणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

MVA CM Face: मविआचा मुख्यमंत्री कोण? संजय राऊतांकडून वेळ, तारीख जाहीर

तीन वेळा होणार फोल्ड, 50MP कॅमेरा; 5,600mAh बॅटरी; Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन येतोय; किती असेल किंमत?

Nashik Politics : नाशिकमध्ये 'सांगली' पॅटर्न; काँग्रेसचे २ इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम? नेमकं काय राजकारण शिजतंय?

Terror Attack: तुर्की दहशतवादी हल्ल्याने हादरलं; १० जणांचा मृत्यू, अनेकांना ठेवलंय ओलीस

SCROLL FOR NEXT