Maharashtra Assembly Election : शिंदेसेनेच्या संजय शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे कुणाला उतरवणार? मतदारसंघाचे गणित समजून घ्या!

Maharashtra Assembly Election 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात ठाकरे गटातून चांगलीच मोर्चेबांधणी सुरु आहे.
 Maharashtra  Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSaam Tv
Published On

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणखी एक चर्चेतला मतदारसंघ आहे, तो म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ. सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत होईल, असं चित्र आहे. कारण संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवाय बंडखोरांची फौज या मतदारसंघात दंड थोपटून उभी आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील वेगाने वाढणाऱ्या भागातील मतदारसंघ म्हणजे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात शहरातील उस्मानपुरा, गारखेडा परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, सातारा- देवाळाई परिसर, पैठण रोड, वाळूज MIDC, पडेगाव, दौलताबाद या नव्याने गतीने विकसित होणारा भाग आहे. या मतदारसंघात गेली तीन टर्म संजय शिरसाट हे शिवसेनेचे आमदार आहेत. एकहाती सत्ता राखण्यात त्यांना आतापर्यंत यश आले. पण यावेळी शिवसेनेत फुट पडल्याने उद्धव ठाकरे शिवसेनेकडून जोरदार ताकद लावली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपमधून नुकतेच आलेल्या राजू शिंदे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आलीय. त्यासाठी स्वतः विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवाय ठाकरे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. दुसरीकडे युतीमध्ये नसतान कॉंग्रेसकडे मागच्या निवडणुकीमध्ये जागा असल्याने कॉंग्रेसचेही इच्छुक बंडखोरी करण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असं सध्या तरी चित्र आहे. विकास कामांमुळे लोक माझ्यासोबत आहेत असा विश्वास संजय शिरसाट यांना आहे.

 Maharashtra  Assembly Election
Maharashtra Politics : 45 शिलेदार झटक्यात उतरवले, पण बंडात साथ देणारे ३ आमदार गॅसवर, पहिल्या यादीत नो एन्ट्री!

कोण कोण इच्छुक आहेत?

संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत. तर ठाकरे सेनेकडून राजू शिंदे यांचे नाव निश्चित झाले, असे सांगितलं जातंय. त्याशिवाय ठाकरे सेनेचे चंद्रकांत खैरे, बाळासाहेब गायकवाड हे इच्छुक आहेत. यातील बाळासाहेब गायकवाड हे बंडखोरी करतील अशी शक्यता आहे. यापूर्वी कॉंग्रेसकडे मतदारसंघ होता. त्यामुळे कॉंग्रेसच्या इच्छुकांनीही तयारी केलीय. जितेंद्र देहाडे हे इच्छुक आहेत. तर मराठवाडा विकासचे रमेश गायकवाड हे मैदानात उतरणार आहेत.

राजू शिंदे, उबाठा शिवसेना उमेदवार

गेल्या पंधरा वर्षांपासून या मतदारसंघांमधील लोकसंख्येची घनता वाढत आहे शिवाय मोठ्या प्रमाणामध्ये हा भाग विकसित होत आहे. या भागातील प्राथमिक गरजा असल्यापैकी रस्ते, पाणी, ड्रेनेज यासाठी संजय शिरसाट यांनी मोठी कामे केल्याची त्यांची ही जमेची बाजू आहे.

 Maharashtra  Assembly Election
Maharashtra Politics: शिंदेंकडून सामंतांना तिकीट, भाजपमधून बंडखोरी, माजी आमदार आज मशाल हाती घेणार!

या मतदारसंघात ४ लाख ३ हजार १३७ मतदार आहेत.मागच्या निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये संजय शिरसाट यांना ८३ हजार ७९२ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आणि अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या राजू शिंदे यांना ४३ हजार ३४७ मते मिळाली होती. आता तेच ठाकरे सेनेकडून मैदानात असतील. दुसरीकडे एमआयएमच्या अरुण बोर्डे यांना ३९ हजार ३३६ मते मिळाली होती.

त्यापूर्वी २०१४ मध्ये संजय शिरसाट यांना ६१ हजार २८२ मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे मधुकर सावंत यांना ५४ हजार ३५५ मते मिळाली होती. २००९ मध्ये संजय शिरसाट यांना ५८ हजार ८ मते मिळाली होती. तर त्यावेळी कॉंग्रेसचे चंद्रभान पारखे यांना ४३ हजार ७९७ मते मिळाली होती.

आता मतदारसंघातील परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. राजकीय समीकरणे आणि आघाड्याही बदलल्या आहेत. जरी संजय शिरसाट यांचा मतदारसंघावर वरचष्मा असला तरी यावेळची निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होणार आहे. प्रवक्ते म्हणून शिंदे सेनेचा किल्ला लढवण्याची जबाबदारी शिरसाट पाडत आहेत. त्यांना त्यांच्या आमदारकीच्या तिसऱ्या काळात मंत्रिपदाची हुलकावणी दोन वेळा दिली आहे. आता सध्या तरी संजय शिरसाट यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र सध्याची बदललेली समीकरणे लक्षात घेता आता त्यांचा हा किल्ला शाबूत ठेवण्यासाठी किल्ला लढवावा लागेल.

 Maharashtra  Assembly Election
Maharashtra Politics: 'गोल्डमॅन'च्या सुपुत्राला मनसेकडून उमेदवारी, खडकवासलातून निवडणुकीच्या रिंगणात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com