Maharashtra Politics : 45 शिलेदार झटक्यात उतरवले, पण बंडात साथ देणारे ३ आमदार गॅसवर, पहिल्या यादीत नो एन्ट्री!

Shiv Sena candidate list : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ४५ जणांची उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. ९ मंत्र्यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Saam TV
Published On

Eknath Shinde Shiv Sena First Candidate List For Vidhan Sabha Election : भाजपनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री उशिरा ४५ जणांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मंत्री आणि बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. पण बंडाच्या वेळी सोबत असणाऱ्या ३ आमदारांना आणखी वेट अॅण्ड वॉच करावे लागणार आहे. पहिल्या यादीत त्यांचा समावेश झालेला दिसत नाही. त्या आमदारांना दुसऱ्या यादीत स्थान मिळू शकते.

कुणाला वेट अॅण्ड वॉच ?

डॉ. बालाजी किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून मागील सलग तीन टर्म आमदार असून यंदा चौथ्या टर्मसाठी त्यांची तयारी सुरू आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या सुरुवातीच्या आमदारांमध्येही बालाजी किणीकर यांचा समावेश होता. तसंच पक्षाचं खजिनदारपद सुद्धा किणीकर यांच्याकडेच आहे. त्यामुळे पहिल्या यादीतच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र मंगळवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत किणीकर यांचं नाव नसल्यामुळे अंबरनाथ शहरात चर्चांना उधाण आलं आहे. बालाजी किणीकर यांना शिवसेना शिंदे गटातल्याच एका मोठ्या गटाचा विरोध असून किणीकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. कदाचित त्यामुळेच तर किणीकर यांची उमेदवारी लांबणीवर पडली नाही ना? अशी चर्चा सध्या अंबरनाथमध्ये सुरू आहे.

CM Eknath Shinde
Shivsena Shinde Group Candidate List: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, ४५ जणांना उमेदवारी; कुणाकुणाला संधी? वाचा..

ठाण्यात एकनाथ शिंदेंची नरमाईची भूमिका?

शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धूसफूस सुरु असल्याचे समोर आलेय. स्थानिक रोषामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपने नरमाईची आणि सावध भूमिका घेतल्याचे दिसतेय. पण २०२२ मधील बंडामध्ये साथ देणाऱ्या सर्वांना पहिल्या यादीत स्थान मिळेल, असाच अंदाज होता.पण आपल्याच गडामधील तीन विद्यमान आमदारांना मात्र वेटिंगवर ठेवण्यात आलेय. त्यामुळे ठाण्यात चर्चा सुरु झाल्यात.

CM Eknath Shinde
Maharashtra Politics : भाजपची ९९ जणांची यादी आली; देवेंद्र फडणवीस, बावनकुळे मैदानात, पाहा कुणाला मिळाली संधी?

शिवसेना शिंदे गटाची संपूर्ण यादी

कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे

साक्री (अज) - मंजूळाताई गावित

चोपडा (अज) - चंद्रकांत सोनावणे

जळगाव ग्रामिण - गुलाबराव पाटील

एरंडोल - अमोल चिमणराव पाटील

पाचोरा - किशोर पाटील

मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील

जोगेश्वरी (पूर्व) - मनिषा वायकर

चांदिवली - दिलीप लांडे

कुर्ला (अजा) - मंगेश कुडाळकर

माहिम - सदा सरवणकर

भायखळा - यामिनी जाधव

कर्जत - महेंद्र थोरवे

अलिबाग- महेंद्र हरी दळवी

महाड- भरतशेठ मारुती गोगावले

उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले

परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत

सांगोला- शहाजी बापू पाटील

कोरेगाव- महेश शिंदे

पाटण- शंभूराज देसाई

दापोली- योगेश कदम

रत्नागिरी- उदय सामंत

राजापुर- किरण सामंत

सावंतवाडी- दीपक केसरकर

राधानगरी- प्रकाश आबिटकर

करवीर- चंद्रदिप नरके

बुलढाणा - संजय गायकवाड

मेहकर (अजा) - डॉ. संजय रायमुलकर

दर्यापूर (अजा) - अभिजित अडसूळ

रामटेक - आशिष जैस्वाल

भंडारा (अजा) - नरेंद्र भोंडेकर

दिग्रस - संजय राठोड

नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर

कळमनुरू - संतोष बांगर

जालना - अर्जून खोतकर

सिल्लोड - अब्दुल सत्तार

खानापुर- सुहास बाबर

छत्रपती संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल

छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) - संजय शिरसाट

पैठण - विलास भूमरे

वैजापूर - रमेश बोरनारे

नांदगाव - सुहास कांदे

मालेगाव बाह्य - दादाजी भुसे

ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक

मागाठाणे - प्रकाश सुर्वे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com