अमरावतीमध्ये एका तरुणाने आपल्या वयोवृद्ध वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे ही घटना घडली. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी अतुल कात्रे (४० वर्षे) या तरुणाला अटक केली आहे. रागाच्या भरात आपण हे कृत्य केले असल्याचे आरोपीने कबुल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्धापकाळात मुलगा सांभाळ करत नसल्याची तक्रार नातेवाईकामध्ये करणाऱ्या वयोवृद्ध पित्याची मुलाने हत्या केली. संतापलेल्या मुलाने लोखंडी बत्याने डोक्यावर वार करून वडिलांची हत्या केली. दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे ही घटना घडली. रामकृष्ण कात्रे (६० वर्षे) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आरोपी अतुल कात्रेला पोलिसांनी अटक केली. राहत्या घरामध्येच अतुलने आपल्या वडिलांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच येवदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पोलिस तपास करत आहेत. मात्र जन्मदात्या वडिलांच्या जीवावर मुलगा उठल्याने खळबळ उडाली आहे.
रामकृष्ण कात्रे यांना ३ मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले आहे. त्यांची मुलगी मयुरीला तिच्या नातेवाईकांनी फोन करून वडीलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मयुरीने वडिलांच्या घरी धाव घेतली असता तिला वडिलांच्या डोक्याला जखमा आणि सर्वत्र रक्त पडलेले दिसले.
त्यामुळे आपल्या वडिलांची हत्या झाल्याचा तिला संशय आला. तिला आपल्या भावावरच संशय होता. याबद्दल तिने पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी अतुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर त्याने वडिलांच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.