Pune Khed Shivapur News : कारमधील 'ते' ५ कोटी कोणाचे? चार जण ताब्यात, पोलिसांनी काय सांगितलं?

Pune khed shivapur toll plaza : पुण्यातील खेड शिवापूर कारमधील ५ कोटी रुपयांबाबत पोलिसांनी उलगडा केला आहे. या कारमधील पाच कोटी रुपये कंत्राटदाराचे असल्याचे पोलिसांनी सांगितली.
कारमधील 'ते' ५ कोटी कोणाचे? चार जण ताब्यात, पोलिसांनी काय सांगितलं?
Pune Khed Shivapur NewsSaam tv
Published On

पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. याचदरम्यान, पुण्यात एका कारमध्ये ५ कोटी आढळले होते. कारमधील ५ कोटी कोणाचे, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या कारमधील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी या कारमधील पाच कोटी कंत्राटदाराचे असल्याचे माहिती दिली आहे.

पुण्यातील खेड-शिवापूरमध्ये पाच कोटींची रक्कम घेऊन जाणाऱ्या कारमध्ये चार जण होते. या कारमधील चारही जणांचे नावे साम टीव्हीच्या हाती आले आहेत. या कारमध्ये प्रवास करणाऱ्यांचे नाव सागर सुभाष पाटील, रफीक अहमह नजीर, बाळासाहेब आण्णासाहेब आसबे, शशिकांत तुकाराम कोळी अशी कारमधील व्यक्तींचे नावे आहेत. या कारमधील सर्व जण सांगोल्यातील राहणारे आहेत. यातील बाळासाहेब आसबे हे कंत्राटदार आहेत. तर शशिकांत तुकाराम कोळी हे चालक आहेत.

कारमधील 'ते' ५ कोटी कोणाचे? चार जण ताब्यात, पोलिसांनी काय सांगितलं?
Pune Accident : कल्याणीनगरमध्ये पुन्हा दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, चालक फरार

कारमध्ये पाच कोटी आढळल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, 'या कारमधील रक्कम ही कंत्रादारांची आहे. कारमधील एकूण रक्कम ही पाच कोटी रुपये आहे. या घटनेची माहिती निवडणूक आयोगाला कळवली आहे. सर्व रक्कम ट्रेझरीला जमा केली आहे. जप्त केलेली रक्कम ही खरी आहे. बँक अधिकारी यांनी तपासले. या नोटा खोट्या नाहीत'.

कारमधील 'ते' ५ कोटी कोणाचे? चार जण ताब्यात, पोलिसांनी काय सांगितलं?
Pune Metro : मध्यरात्री मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्याला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

नेमकं काय घडलं होतं?

पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारमधील पाच कोटी रुपयांची रक्कम पकडली होती. कारमधील रक्कम जप्त केल्यानंतर पोलिसांनी निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि आयकर विभागाचे अधिकाऱ्यांना पोलीस चौकीत कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही कार सांगोल्यातील अमोल नलावडे या नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. या कारवाईबाबत पोलीस निरिक्षक राजेश गवळी, प्रांत अधिकारी यशवंत माने आणि निवडणूक अधिकारी यांनी यांनी उत्तर दिलं नव्हतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com