Pune News: पुण्यात सापडलं मोठं घबाड! निवडणूक रणधुमाळीत अंदाजे ५ कोटींची रोकड जप्त केल्यानं खळबळ

Pune Crime News: राज्यात आचारसंहिता लागू पुण्यात नाकाबंदीदरम्यान एका खासगी वाहनातून अंदाजे पाच कोटी रुपये रोकड जप्त केली आहे.
पुण्यात सापडलं मोठं घबाड! निवडणूक रणधुमाळीत अंदाजे ५ कोटींची रोकड जप्त केल्यानं खळबळ
Pune NewsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असताना येथील खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम अंदाजे पाच कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. येताच पुणे जिल्ह्यातील भोरच्या जवळ राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदीच्या वेळेस एका गाडीत मोठी रोकड आढळून आली.

पुण्यात सापडलं मोठं घबाड! निवडणूक रणधुमाळीत अंदाजे ५ कोटींची रोकड जप्त केल्यानं खळबळ
Maharashtra Politics: मुरबाड मतदारसंघात मविआच्या अडचणीत वाढ, शरद पवार गटाचे नेते बंडाचा झेंडा फडकवणार?

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ६६७ तक्रारी प्राप्त

दरम्यान, राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

पुण्यात सापडलं मोठं घबाड! निवडणूक रणधुमाळीत अंदाजे ५ कोटींची रोकड जप्त केल्यानं खळबळ
Eknath Shinde : मोठी बातमी! यादी जाहीर होण्याआधीच CM एकनाथ शिंदेंनी पहिल्या उमेदवाराची केली घोषणा

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com