Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Crime News Ambernath : बाबा आईला सोडा...; मुलानेच केली बापाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Son Killed His Father : त्यामुळे घरात सतत वाद आणि नैराश्य पसरले होते. या कारणाने तरुणाने आपल्या आईचीच हत्या केली आहे.

अजय दुधाणे

Ambernath Crime News : अंबरनाथमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका मुलानेच आपल्या बाबांची हत्या केली आहे. बाप सतत दारूच्या नशेत आईला मारहाण करत होता. त्यामुळे घरात सतत वाद आणि नैराश्य पसरले होते. या कारणाने तरुणाने आपल्या बापाचीच हत्या केली आहे. (Ambernath)

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा परिसरात राजेश वर्मा हा त्याची पत्नी अनिता आणि १९ वर्षांचा मुलगा प्रकाश याच्यासह वास्तव्याला होता. राजेशला दारूचं व्यसन होतं आणि त्यातूनच नवरा बायकोमध्ये सतत वाद होते.

राजेश हा त्याची पत्नी अनिताला मारहाण करत होता. ही बाब मुलगा प्रकाश याला खटकत असल्याने प्रकाश आणि राजेश यांच्यातही वाद होत होते. रविवारीही राजेश हा दारू पिऊन पत्नी अनिताला मारहाण करत असताना मुलगा (Son) प्रकाश याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही तो मारहाण करतच असल्यामुळे प्रकाशने घरातील चाकू घेऊन राजेश याच्या छातीत खुपसला.

या घटनेत राजेशचा मृत्यू झाला. यानंतर अंबरनाथ (Ambernath) पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजेश वर्मा याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला, तर पत्नी अनिता वर्मा हिच्या फिर्यादीवरून मुलगा प्रकाश वर्मा याच्याविरोधात पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT