Mumbai Crime: पोलीस काहीच करू शकणार नाही म्हणत तरुणाला तलवार, हॉकी स्टिकने बेदम मारहाण

Kalyan Crime News : मारहाण करणारे तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे जखमी मयूरने सांगितले.
Kalyan Tarun Marhan
Kalyan Tarun Marhansaam tv

>>अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Tarun Marhan : कल्याणमध्ये १० ते १२ तरुणांच्या टोळीने एका तरुणाचं राहत्या घरातून अपहरण करत त्याला बेदम मारहणा केल्याची घटना घडली आहे. कल्याण वाडेघर परिसरात रात्रीच्या सुमारास घडली या टोळीन तरुणाला तलवारीच्या उलट्या बाजूने आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

मयूर शिवदास असे जखमी तरुणाचे नाव आहे. मारहाणीत मयूरला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करणाऱ्या तरुणांनी आम्ही पोलिसांना हप्ते देतो, त्यामुळे ते आमचे काही वाकडे करणार नाही, अशी धमकी देखील या टोळीने मयूरला दिली.

या घटनेनंतर हे तरुण पसार झाले आहेत. मारहाण करणारे तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे जखमी मयूर याने सांगितले. या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Kalyan Tarun Marhan
Weather Forecast Today: विदर्भावर पुन्हा गारपीटीचं संकट! येत्या २ ते ३ दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

कल्याण पश्चिम वाडेघर परिसरात मयूर शिवदास हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांशी बरोबर त्याचे याआधी वाद झाले होते. रविवारी रात्री मयूर घरात जेवत असताना दहा ते बारा तरुण त्याच्या घरात शिरले आणि त्यांनी मयूरला मारहाण करत घराबाहेर उभी केलेल्या गाडीत बसवून नेले. (Mumbai News)

त्यानंतर त्याला तलवारीच्या उलट्या बाजूने, हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने बेदम मारहान केली. आम्ही पोलिसांना हप्ते देतो, पोलीस आमचे काहीच करू शकणार नाही अशी धमकी देखील त्यांनी मयूरला दिली. (Mumbai Crime News)

Kalyan Tarun Marhan
Horoscope Today : मीन राशीला महत्त्वाची वार्ता समजेल, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

मयूरला टोळीने घरातून उचलून नेल्यानंतर कुटुंबियांनी तत्काळ खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान या टोळीने मयूरला मारहाण केल्यानंतर पुन्हा कल्याण आधारवाडी परिसरात सोडून दिले. या मारहाणीत मयूरला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com