कोरोना... हे नाव ऐकलं तरी अनेकांची धडकी भरते... याच कोरोनामुळं मुंबई जागच्या जागी स्तब्ध झाली होती... मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स हे शब्द कानावर पडत होते....आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. त्यामुळं मुंबईकरांचं टेन्शन वाढलंय.. मुंबईत कोरोनाचे 56 रुग्ण आढळून आलेत...तर 2 जणांचा मृत्यू झालाय....त्यामुळं महापालिका अलर्ट मोडवर आलीय....
कोरोना रुग्ण आढळल्यानं महापालिका अलर्ट मोडवर
सेव्हन हिल्स रुग्णालयात 20 आयसीयू बेड
कस्तुरबा हॉस्पिटलमध्येही 112 बेड्सची व्यवस्था
दुसरीकडे मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी केलंय..
जेव्हा कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातलं होतं... त्यावेळीही सरकारी यंत्रणा घाबरुन न जाण्याचं आवाहन करत होत्या...आता पुन्हा कोरोना दाराबाहेर उभा आहे. त्यामुळं घाबरुन न जाता कोरोना पासून वाचण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी? पाहूयात....
नागरिकांनी मास्क वापरावा
डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा
वारंवार हात धुवावे, स्वच्छता बाळगावी
डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधं घ्या
हलक्या आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा
कोरोना कितीही घातक असला तरी त्याला रोखणं अशक्य नाही.. मात्र त्यासाठी प्रत्येकानं नियम काटेकोरपणे पाळायला हवेत.. जर कोरोनाचे नियम पाळले नाहीत आणि कोरोनाचे रुग्ण असेच वाढत गेले तर मात्र लॉकडाऊन अटळ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.