Maharashtra Rain
Maharashtra Rain update Saam tv

Maharashtra Rain : पुण्यासहित राज्यात तुफान पाऊस; पुढील ३-४ तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

Maharashtra Rain update : राज्यातील विविध जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालीये. हवामान विभागानेही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Published on

Pune Rain Update : पुण्यासहित राज्यातील विविध भागात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी होर्डिंग आणि बॅनर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात तीन ठिकाणी होर्डिंग कोसळले. अचानक बरसणाऱ्या या पावसामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची धावाधाव पाहायला मिळत आहे. तर हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे.

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी उंच ढगांची निर्मिती झाली आहे. राज्यात पुढील ३-४ तास विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली हे. तर या पावसामुळे वारा आणि कमी वेळात जास्त पावसामुळे झाडे पडणे, पाणी साचण्याची शक्यता व्यक्त व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Rain
Special Interview : पाकिस्तानचे हवाई अन् ड्रोन हल्ले कसे रोखले? सैन्य दलाच्या अधिकाऱ्यानी सांगितला थरारक अनुभव

पुण्यात पावसामुळे होर्डिंग कोसळले

पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडले फ्लेक्स आणि बॅनर कोसळल्याची घटना घडली. तर पुण्यातील धानोरी, पोरवाल रोडवर होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत सुदैवाने कोणी ही जखमी झालेले नाहीत. अग्निशमन दल दाखल घटनास्थळी दाखल होऊन होर्डिंग बाजूला घेतले जात आहेत. पुण्यात मुसळधार पावसात होर्डिंग कोसळल्यानंतर सात ते आठ दुचाकी दबल्या. या घटनेत कोणीही जखमी नाही. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे होर्डिंग कोसळले.

Maharashtra Rain
Corona Virus Update : जगात कोरोनाचा कहर, भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? आरोग्यतज्ज्ञ काय म्हटले? वाचा

वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडाला

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मांडवा गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडाला. मंडप उडाल्याने वऱ्हाडी मंडळीची चांगली तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. मागील पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसामुळे मागील दोन दिवसांत अंगावर वीज पडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे.

Maharashtra Rain
Kalyan : सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली दबून चौघांनी जीव गमावला, परिसरात हळहळ

दक्षिण रायगडात अवकाळी पावसाच्या सरी

रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात आज दुपारपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. माणगाव, महाड आणि पोलादपुर तालुक्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. माणगाव शहरातील सखल भागात नाल्याचे पाणी साचलं आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com