complete gandhari bridge work demands villagers from raigad  Saam Digital
मुंबई/पुणे

Rasta Roko Andolan : रायगड विभागातील 25 गावे, आणि वाड्यांचा संपर्क तुटेल? गांधारी पूलाच्या कामासाठी ग्रामस्थांचा रास्ता राेकाे, लवकरच प्रांत कार्यालयात बैठक

Siddharth Latkar

- सचिन कदम / अमाेल कलये

रायगड जिल्ह्यातील अपूर्ण अवस्थेतील गांधारी पुल प्रकरणी रायगड विभागातील ग्रामस्थ आज (साेमवार) संतप्त झाले. शेकडाे ग्रामस्थ गांधारी पुला लगत एकत्र आले. त्यानंतर सर्वांनी रस्त्यावर उतरून रास्ता राेकाे आंदाेलन केले. यावेळी ग्रामस्थांनी रायगड प्रशासनाच्या कारभाराचा घाेषणा देत निषेध नाेंदविला. दरम्यान महाडच्या वरिष्ठ पाेलिसांच्या मध्यस्थितीने गांधारी पुलासाठीचे आंदोलन ग्रामस्थांनी तात्पुरते मागे घेतले आहे.

महाड रायगड रस्त्यावरील गांधारी पुलाचे काम रखडल्याने रायगड विभागातील 25 गाव आणि शेकडो वाड्यांचा महाड शहर आणि मुख्य रस्त्याशी संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरु झाला तरी पुलाच्या पिलर्सचे काम अर्धवट स्थितीत आहे. पुलाचे स्लॅब देखील बाकी आहेत. नदीला पाणी वाहू लागले की कोणतेही काम होणे शक्य नाही. त्याच बरोबर पर्यायी रस्ता म्हणून नदीत पात्रात टाकलेला भराव काढून टाकावा लागणार आहे. यामुळे रायगड विभागातील ग्रामस्थांमध्ये महाड शहर आणि मुख्य रस्त्याशी संपर्क तुटण्याची भिती निर्माण झाली आहे.

लाडवली गावानजीक गांधारी पुलाचे काम डिसेंबर महिन्यात सुरु झाले. पुरेसा वेळ मिळून देखील ठेकेदार पुलाचे काम वेळेत पूर्ण करू शकलेला नाही. याचा परिणाम येथील दळीवळणा बरोबरच रायगड किल्ला आणि रायगड विभागातील पावसाळी पर्यटनावर होणार आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी तसेच पर्याची रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आंदाेलन तात्परते स्थगित

महाडचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक (DYSP) शंकर काळे यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर ग्रामस्थांनी गांधारी पुलासाठीचे आंदोलन तात्पुरते मागे घेतले. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात ग्रामस्थ तक्रार दाखल करणार आहेत. महाड प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेऊन पुलाच्या कामा संबंधी वेळ निश्चिती केली जाणार आहे. रायगड विभागाचा संपर्क तुटणार नाही यासाठी उपाययोजना व्हाव्यात यासाठी बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

आंदाेलनामुळे चिपळूण गुहागर मार्ग वाहतुकीसाठी झाला बंद

रत्नागिरी - चिपळूण गुहागर मार्गावर निकृष्ट रस्त्याच्या कामावरून रामपूर येथे ग्रामस्थांनी आज (साेमवार) रास्ता रोको आंदाेलन छेडले. यामुळे रत्नागिरी - चिपळूण गुहागर मार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या माेठ्या रांगा लागल्या आहेत. यावेळी आंदाेलकांनी निकृष्ट रस्त्याच्या कामावरून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या रास्ता रोको आंदाेलनामुळे चिपळूण गुहागर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Food Poisoning : खळबळजनक! लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; प्रशासनाची धावपळ

Astro Tips: घराच्या बाहेर घार फिरतेय? हे आहेत संकेत?

Health Tip: सतत घाम येतोय? आहारात करा 'हा' छोटा बदल!

Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात.. आधी महिलेला धडक, नंतर कार थेट दुकानात , १ गंभीर जखमी

Viral Video: तरुणांना चढला नवरात्रीचा फिवर, ''जय माता दी'' म्हणत दिल्ली मेट्रोमध्ये गायलं गाणं; व्हायरल VIDEO ची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT