Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana  Saam tv
मुंबई/पुणे

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेविषयी महिलांना काय वाटतं? आतापर्यंतचे सर्व अपडेट एका क्लिकवर

Vishal Gangurde

मुंबई : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकींचे वेध लागले आहेत. याचदरम्यान, राज्य सरकारने अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांसाठी विविध विषयांची घोषणा केली. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचाही समावेश आहे. महिलांसाठीची ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. या योजनेच्या माध्यमांतून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेमुळे महिला वर्गांमध्ये उत्साह आहे. या योजनेविषयी महिलांना काय वाटतं, यावर महिलांना काय वाटतं, जाणून घेऊयात.

राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी ही योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने राबवता येऊ शकते. राज्य सरकारच्या 'नारीशक्ती दूत' मोबाईल अॅपद्वारे किंवा सेतू सुविधाद्वारे केंद्रावर जाऊन या योजनेसाठी अर्ज भरता येईल. तसचे अंगणवाडी केंद्रात देखील ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल. या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. तर योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासूनच सुरु करण्यात आली आहे.

या योजनेतून काही अटी देखील वगळण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, जर महिलांकडे प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी १५ वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या ४ पैकी कोणतही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. या योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलेचा परराज्यात जन्म झाला. मात्र, नवरा हा महाराष्ट्रातील अधिवास असलेला पुरुष लग्न केलं असेल. तर त्या नवऱ्याचं जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाईल. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखल नसेल तर त्यांच्या कुटुंबाजवळ पिवळं किंवा केशरी रेशनकार्ड असल्यास त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे.

कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबातील विवाहित आणि अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचाही लाभ घेता येईल. विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असायला हव्या. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न देखील २.५ लाखांपेक्षा कमी असायला हवं. तसेच घरातील कोणीही सरकारी नोकरीतील कर्मचारी किंवा इनकम टॅक्स भरणारं नसावं. तसेच या योजनेचा पहिली हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

योजनेविषयी लिंबू विक्रेत्या महिलेला काय वाटतं?

'मी या योजनेसाठी अर्ज केला आहे. मी कल्याणजवळील लक्ष्मी मार्केटमध्ये लिंबूचा व्यवसाय करते. या व्यवसायातून दिवसाला ३०० रुपये मिळतात. या दिवसाच्या कमाईतून घरापूर्ती पेसे मिळतात. पण योजनेमुळे महिन्याला १५०० रुपये मिळतील. त्यामुळे दिवसाला ५० रुपये वाट्याला येतात. मासिक १५०० रुपये अडीअडचणीला उपयोगी मिळू शकता. या योजनेसाठी कागदपत्रांची पुर्तता करताना अडचणी आल्या. या योजनेमुळे गरिबांना आधार मिळेल. योजनेतून मिळणारी रक्कम गरिबांसाठी ती देखील खूप मोठी आहे, असं मत लिंबू विक्रेत्या ज्योती यांनी दिली.

'योजनेचं स्वागत करावसं वाटतं. ही योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. एसटी महामंडळासारखी योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे. योजना कागदावर राहिली नाही पाहिजे. अंमलबजावणी झाली पाहिजे. या योजनेचं स्वागत केलं पाहिजे. खूप चांगली योजना असून सरकारचा धाडसी निर्णय आहे. याचा फायदा महिलांना होईल, असं मत मीडियाशी बोलताना शिक्षक महिलेने व्यक्त केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IT Act Amendment: केंद्राच्या फॅक्ट चेक युनिटला झटका, IT कायद्यातील दुरुस्ती असंवैधानिक, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

SCROLL FOR NEXT