Ladki Bahin Yojana Installment: तारीख ठरली! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार? अर्थमंत्री अजित पवारांनी थेट सांगितलं

Ladki Bahin Yojana First Installment On Rakshabandhan: येत्या रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे. कारण योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana: तारीख ठरली! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार?  अर्थमंत्री अजित पवारांनी थेट सांगितलं
Ladki Bahin YojanaSaam TV
Published On

मुंबई: राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. येत्या रक्षाबंधनाला (Rakshabandhan) राज्यातील लाडक्या बहि‍णींना सरकारकडून एक खास गिफ्ट मिळणार आहे. लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. या योजनेसाठी महिलांची खाती उघडण्यासाठी 'युआरएल' तयार केला जाणार आहे.

पहिला हप्ता किती हजारांचा असणार?

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे. या योजनेच्या (Ladki Bahin Yojana) पहिल्या हप्त्यामध्ये महिलांना तीन हजार रूपये रक्कम मिळणार असल्याची माहिती समोर येतेय. ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून राजकीय नेत्यांनी विशेष शिबिरं आयोजित केली होती. ठिकठिकाणी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.

लाडकी बहिण योजनेसाठी 'युआरएल'

'युआरएल' तयार करण्यासाठी आजपासून सुरूवात होतेय. या योजनेचा लाभ अडीच कोटी लाभार्थी महिलांना मिळणार असल्याची चर्चा सुरूय. योजनेसाठी महिलांना स्वत:चं नाव नोंदविण्यासाठी हे युआरएल तयार केलं जात (Ladki Bahin Yojana First Installement) आहे. योजनेसाठी वेगात महिलांची नोंदणी केली जातेय. सामान्यपणे आपण जसे इतर युआरएल हाताळतो, त्याचप्रमाणे लाभार्थी महिलेला तिचा संपूर्ण तपशील या युआरएलमध्ये भरता येणार आहे.

Ladki Bahin Yojana: तारीख ठरली! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार?  अर्थमंत्री अजित पवारांनी थेट सांगितलं
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींसाठी १०० रुपयांमध्ये उघडणार खाते; धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुढाकार

आतापर्यंत ४४ लाख महिलांची नोंद

आतापर्यंत योजनेसाठी ४४ लाख महिलांची नोंद करण्यात (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आलीय. तर १० लाख अर्ज संबंधित खात्यापर्यंत पोहोचले आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना एका अर्जामागे ५० रूपये देण्याची घोषणा केलीय. अनेक वेळा सर्व्हर व्यवस्थित काम करत नसल्यामुळे हजारो फॉर्म्स रखडले आहेत. मतदारयादीमधील महिलांची पात्रता पाहून अर्जाची एन्ट्री करणं सुरू आहे.

Ladki Bahin Yojana: तारीख ठरली! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार?  अर्थमंत्री अजित पवारांनी थेट सांगितलं
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! सुट्टीच्या दिवशी स्वीकारले जाणार 'लाडकी बहीण योजनेचे अर्ज', नागपूरमध्ये 'या' तारखेला कार्यालये राहणार सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com