Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! सुट्टीच्या दिवशी स्वीकारले जाणार 'लाडकी बहीण योजनेचे अर्ज', नागपूरमध्ये 'या' तारखेला कार्यालये राहणार सुरू

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Applications Date: लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता सुट्टीच्या दिवशी देखील स्वीकारले जाणार आहेत. राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.
लाडकी बहीण योजनेचे अर्ज
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूरमधून लाडकी बहीण योजनेच्या अर्जासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. आता सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू राहणार आहेत. आता १३ आणि १४ जुलै रोजी देखील नागपूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा, उपविभाग आणि तालुका स्तरावर आहे . या योजनेमुळे राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जासंदर्भात मोठी अपडेट

योजनेचे कामकाज कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच जिल्हा, उपविभाग आणि तालुका स्तरावरील कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी १३ आणि १४ जुलै रोजी सुरु राहणार आहेत. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १३ हजार ६०० अर्ज आलेत. विदर्भात 'लाडकी बहीण योजने'ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Applications Date) आहे.

लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक मदत

महाराष्ट्रात मध्य प्रदेशातील 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana 2024) सुरू करण्यात आलीय. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सरकार आर्थिक मदत करणार आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यावर याअंतर्गत राज्य सरकार दरमहा १५०० रुपये पाठवणार आहे. सरकारने या योजनेच्या नियमांत काही बदल केले होते.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना दिलासा; रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे या महिन्यापर्यंत असणार निशुल्क

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

'या' योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा आर्थिक लाभ देण्यात येणार (Ladki Bahin Yojana Update) आहे. या योजनेच्या पात्रतेच्या निकषांत १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. राज्यातील महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना (Nagpur News) सुरू करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज
Ladki Bahin Yojana Installation: लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार? अजित पवारांनी थेट तारीखच सांगितली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com