मुंबई : देशभरातील गरोदर महिलांसाठी मोदी सरकारने विशेष योजना आणली आहे. मोदी सरकारने मातृत्व वंदना योजना ही गरोदर महिलांसाठी आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून किमान ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी मोदी सरकार आर्थिक मदत करणार आहे.
महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना चालवण्यात येत आहे. ही योजना २०१७ सालापासून सुरु आहे. या योजनेविषयी बहुतेक महिलांना माहिती नाही. यासाठी या मातृत्व वंदना योजनेविषयी माहिती जाणून घेऊयात. या योजनेचा अनेक गरोदर महिला लाभ घेऊ शकता.
मातृत्व वंदना ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट्स पैकी एक आहे. महिलांसाठी ही भन्नाट योजना आहे. पहिल्यांदा गरोदर झालेली महिला ५ हजार रुपये आणि दुसऱ्यांदा गरोदर झालेल्या महिलांना योजनेद्वारे ६ हजार रुपये मिळतात.
या योजनेनुसार, दुसऱ्यांदा मुलगी झाल्यास त्या महिलेला या योजनेचा दोनदा लाभ घेता येईल. पहिल्यांदा गरोदर झालेल्या आर्थिक मदत मिळेल. दोन हप्त्यामध्ये ही मदत दिली जाईल. पहिल्या हप्त्यात ३ हजार रुपये तर दुसऱ्या हप्त्यात २ हजार रुपये मिळेल. तर दुसऱ्यांदा गरोदर झाल्यानंतर मुलगी झाल्यास एकाच हप्त्यात ६ हजार रुपये मिळतील.
अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, या योजनेचा फायदा घेण्यासाठी सर्व अटींची पूर्तता करावी लागणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी हवे. बीपीएल कार्डधारक महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. अनुसूचित जाती आणि जनजातीच्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच ई-श्रम कार्डधारक, मनरेगा जॉब कार्डधारक, शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थी महिलांनाही लाभ मिळेल.
या योजनेसाठी गरोदर महिला या https://wcd.delhi.gov.in/wcd/pradhan-mantri-matru-vandana-yojana-pmmvy यावर लॉग इन करून अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी ओळख पत्र, घरचा पत्ता आणि उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे. अंगणवाडी केंद्रात जाऊनही या योजनेसाठी नोंदणी करता येईल. http://wcd.nic.in या वेबसाईटवर जाऊन फॉर्म डाऊनलोड करून त्यात माहिती भरून अंगणवाडी केंद्रात अर्ज जमा करता येऊ शकतो. तसेच कागदपत्रेही द्यावी लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.