bhima koregaon vijay stambh saamtv
मुंबई/पुणे

Bhima Koregaon Shaurya Din: भीमा-कोरेगाव शौर्यदिन : १४ कोटींच्या निधीची मागणी, २० लाख अनुयायी येणार; प्रशासनाची तयारी सुरु

सरकारने सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीने केली आहे.

Siddharth Latkar

- राेहिदास गाडगे / सचिन जाधव / नितीन पाटणकर

Pune News :

पुण्यातील भिमा कोरेगाव (Bhima Koregoan) येथे येत्या १ जानेवारीला होत असलेल्या विजयस्तंभ शौर्य दिनाला अभिवादन करण्याच्या दरवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के जादा अनुयायी येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी येणा-या सर्व अनुयायींना सुविधांच्या अडचणी जाणवू नयेत यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळवीर नियाेजन सुरु केले आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख (pune collector dr rajesh deshmukh) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा विजयस्तंभाला दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखो अनुयायी अभिवादन करत असतात. येत्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या या अभिवादन कार्यक्रमासाठी देशभरातून सुमारे २० लाख अनुयायी दाखल होणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या शौर्यदिनाचा हा संपूर्ण खर्च ‘बार्टी’कडून न करता यंदाच्या वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने पुणे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात यावा किंवा राज्य सरकारने यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा अस मागणी पत्र पालकमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आल आहे. याबाबतची माहिती उत्सव समितीचे राहुल डंबाळे आणि उमेश चव्हाण यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१४ कोटींचा निधी द्या

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठीचा खर्च हा पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात यावा किंवा पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन कऱण्यात आलेल्या प्रशासकीय समितीला राज्य सरकारने सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने निवेदनाद्वारे केली.

दरम्यान यंदा अनुयायींची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून वाढीव बंदोबस्त, पार्किंग व्यवस्था, बस सेवा, आरोग्य सेवा जास्तीने पुरविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सर्व विभागाचे आधिकारी यांच्या समवेत कोरेगाव भिमा येथे पहाणी केली. यावेळी योग्य नियोजनासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी चांगला समन्वय ठेवावा अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अधिका-यांना दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मत मोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT