महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील सतत चर्चेत असतात. विश्वास नांगरे पाटील पु्न्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा सध्या पुण्यात आणि राज्यभरात सुरु आहे. शिंद गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
विश्वास नांगरे पाटील यांची पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्ती होईल, असा विश्वास शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आहे. कारण गृहमंत्रालयाच्या आदेशापूर्वीच शिंदे गटतील एका पदाधिकाऱ्याने व्हॉट्सॲपवर याबाबत स्टेटस ठेवलं आहे. या स्टेटसची चर्चा सध्या पुण्यासह राज्यात आहे. (Latest Marathi News)
'बॉस लवकरच पुण्यात?', असा मजकूर या पदाधिकाऱ्याने स्टेटसवर लिहिला आहे. सोबत विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो लावला आहे. या स्टेटसची पुण्यासह राज्यभरातील आयपीएस आणि वरीष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र गृहमंत्रालयाच्या आदेशाआधीच वरिष्ठ अधकाऱ्यांच्या बदल्या कार्यकर्त्यांना आधीच कशा कळतात? हा प्रश्न कायम आहे. विश्वास नांगरे पाटील सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
दुसरीकडे पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचा देखील कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. मात्र पुढील २-३ महिन्यात रितेश कुमार यांची पदोन्नती होत आहे. त्यामुळे पुण्याची जबाबदारी कुणावर दिली जाणार याबाबत चर्चा रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.