Success Story: कौशल्याच्या बळावार धनश्रीने थाटला स्वयंरोजगार, तेवरेंच्या केशकर्तनालयाची युवा वर्गात क्रेझ

लहानपणापासून कुटुंबाची जबाबदारी स्वत: पेलत धनश्री तेवरे यांनी महिला देखील काेठे कमी नाहीत हे समाजाला दाखवून दिले.
success story of dhanashree tevre who runs salon in somatane near maval
success story of dhanashree tevre who runs salon in somatane near mavalsaam tv
Published On

Maval News :

मुलांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी आणि संसाराचा गाडा हाकण्यासाठी तिने चक्क हाती वस्तरा घेतला. तिच्या कर्तुत्वाची सर्वत्र चर्चा हाेऊ लागली आणि अवघ्या काही दिवसांत सोमटणे येथील धनश्री तेवरे (success story of dhanashree tevre from maval) या माेठ्या धैर्याने सलून चालवू लागल्या. बघता बघता माेठ्या धाडसाने त्यांनी थाटलेला छाेटासा व्यवसाय आता बहरु लागला आहे. (Maharashtra News)

धनश्री या गेली बारा वर्षे (maval) सोमाटणे फाटा येथे राहतात. त्या दोन महिन्याच्या असताना त्यांची आई गेली. त्यानंतर त्यांचा आजीने संभाळ केला. धनश्री यांच्या लग्नानंतर त्यांची काही आजीही काही दिवसांत देवाघरी गेली. आता सासरच माहेर समजायचं आणि पुढे जाण्याचा त्यांनी ठरवलं.

success story of dhanashree tevre who runs salon in somatane near maval
Pankaja Munde : मुंडेंच्या परळीत उद्या शासन आपल्या दारी, खासदारांची असणार अनुपस्थिती, पंकजांच्या भूमिकेकडे बीडवासियांचे लक्ष

आपल्या कुटुंबाला हातभार लागावा यासाठी नव-याला साथ देण्यासाठी आपण देखील काही तरी करावे असे धनश्री यांनी ठरवलं. त्यातूनच त्यांनी व्यवसाय करायचा ठरवले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी ब्युटी पार्लर टाकले. मात्र महिलांकडून त्यांना हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. मग धनश्री यांनी पुरुषांची दाढी व कटिंग करायचा ठरवले. गेली तीन वर्ष झाले त्या दाढी, कटिंग, फेशियल, मसाज, लहान मुलांची कटिंग सफाईदारपणे करतात.

चूल आणि मूल या दोन्ही गोष्टी सांभाळत धनश्री तेवरे या सोमाटणे येथे सलून चालवतात. या भागातील अनेक लोक हे त्यांच्याकडे खास दाढी आणि कटिंग करण्यासाठी येत असतात. धनश्री तेवरे यांच्या केशकर्तनालयातील काैशल्यामुळे त्यांच्याकडे युवा ग्राहक वेगवेगळ्या स्टाईल करण्यासाठी येताे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या या व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातून त्या आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी पैशांची बचत करत आहेत. आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन त्यांचे भविष्य उज्वल करावे अशी त्यांची धारणा आहे.

Edited By : Siddharth Latkar

success story of dhanashree tevre who runs salon in somatane near maval
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com