Gadchiroli : गडचिराेलीत नक्षलवाद्यांनी वाहने पेटवली, शुक्रवारी भारत बंदची घाेषणा

नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने 16 ते 22 डिसेंबर कालावधीत बदला सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली आहे.
naxalites set fire vehicles in gadchiroli
naxalites set fire vehicles in gadchirolisaam tv

- मंगेश भांडेकर

Gadchiroli News :

गडचिराेली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिदूर-दोबुर-पोयारकोटी या रस्त्याच्या कामासाठी आणलेले तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळून टाकले आहेत. घटनास्थळी 22 डिसेंबरचा भारत बंद (naxals calls bharat bandh on 22 december) यशस्वी करा असे हिंदीमधील पत्रक आढळून आले आहे. (Maharashtra News)

भामरागड तालुक्यातील हिदूर-दोबुर-पोयारकोटी या रस्त्याचे बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या कामासाठी मंगळवारी रात्री हिदूर गावात वाहने ठेवण्यात आली. या गावात नक्षलवादी आले. त्यांनी तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबीला आग लावली. त्यामुळे चारही वाहने जळून खाक झाली. यामध्ये कंत्राटदराचे मोठे नुकसान झाले आहे.

naxalites set fire vehicles in gadchiroli
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी पत्रक टाकले. या पत्रकात 22 डिसेंबर को भारत बंद सफल बनाओ असे आवाहन त्यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्याची दिसून येत आहे.

बदला सप्ताह

एका प्रवक्त्याच्या माहितीनूसार देशातील 40 टक्के खनिजे झारखंडमध्ये आहेत. ज्याची वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांकडून लूट केली जात आहे. या लुटीविरोधात आम्ही क्रांतिकारी चळवळ चालवत आहोत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे या कंपन्यांना खनिजांची पूर्णपणे लूट करता येत नाही. अशा स्थितीत भाजप सरकारच्या सहकार्याने क्रांती आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व बाबींच्या अनुषंगाने बदला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या हल्ल्यांच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत बदला सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

naxalites set fire vehicles in gadchiroli
MOVEMENT FOR INDEPENDENT VIDARBHA STATE: 'वेगळ्या विदर्भासाठी 'करू किंवा मरू..!'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com