Dr Babasaheb Ambedkar Statue Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो ते फक्त बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Dr Babasaheb Ambedkar Statue: कल्याण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan News:

शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो, ते फक्त बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळेच, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वांवर काम करीत आहेत. संपूर्ण देशात सामाजिक न्याय, सामाजिक समता, समाजाचा सर्वांगीण विकास या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे. सामाजिक न्यायाचे पर्व निर्माण होण्यासाठी, त्या दृष्टीने काम करण्यासाठी हे शासन देखील कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

कल्याण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यासमोर सदैव नतमस्तक राहावे, असे हे व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उभे केलेले काम संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरले आहे. जगातील सर्वोत्तम संविधान त्यांनी जगाला दिले आहे. कल्याण (पूर्व) येथील निर्माण केलेल्या या स्मारकाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट विविध प्रकारे उलगडून दाखविला जाणार आहे.  (Latest Marathi News)

डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार सामाजिक क्रांतीचा वसा घेऊन हे शासन काम करीत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, शिक्षण, आर्थिक, विचार स्वातंत्र्य ही बाबासाहेबांनी दिलेली शिकवण हाच या सरकारच्या राज्यकारभाराचा पाया आहे. या संविधानामुळेच सर्वसामान्य व्यक्ती खासदार, आमदार, मुख्यमंत्री बनू शकतो. डॉ.बाबासाहेबांचे कर्तृत्व हे अशा स्मारकांमध्ये निश्चितच मावणारे नाही. परंतु त्यांचा जीवनपट अशा स्मारकांमधून लोकांसमोर आणल्यानंतर हे स्मारक सर्वांसाठी ऊर्जा स्रोत ठरणार आहे. सरकारच्या माध्यमातून या स्मारकाच्या पुढील निर्माणासाठी देखील निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडला. हा विचार घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी तसेच महाराष्ट्र सरकार आपले काम करीत आहे. म्हणूनच डॉ.बाबासाहेबांनी दिलेला सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन आपला भारत देश सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येते.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाच्या निर्मितीविषयीचे विचार व्यक्त करताना सांगितले की, हे स्मारक सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. सर्वांचे आभार व्यक्त करीत ते पुढे म्हणाले की, हे फक्त पुतळ्याचे अनावरण नाही तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र विविध माध्यमातून लोकांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे स्मारक केवळ इमारत म्हणून नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे दिशादर्शक ज्ञान केंद्र असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

SCROLL FOR NEXT