Eknath Shinde News Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde Property: मुख्यमंत्री शिंदेंच्या संपत्तीत २६ कोटींनी वाढ, १५ कोटींचं कर्ज; जाणून घ्या एकूण संपत्तीचा आकडा

Eknath Shinde Property information : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत २६ कोटींनी वाढ झालीये. तर शिंदे आणि त्यांच्या पत्नीवर १५ कोटींचं कर्ज आहे.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सोमवारी कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. मुख्यमंत्र्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या एकूण संपत्तीत मागील पाच वर्षांत २६ कोटींनी वाढ झाली आहे.

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी आज सोमवारी उमेदवार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांक्ष शिंदे, खासदार नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, आनंद परांजपे, केंद्रीय गृहमंत्री रामदास आठवले, मिनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ६० वर्षीय एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. एकनाथ शिंदे यांचं बीएससी शिक्षण झालं आहे. एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती ३७ कोटी ६८ लाख ५८ हजार १५० रुपये इतकी आहे. तर पाच वर्षांआधी त्यांची संपत्ती ११ कोटी ५६ लाख ७२ हजार,४६६ रुपये इतकी होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात १८ गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावे १ कोटी ४४ लाख ५७ हजार,१५५ रुपयांची जंग मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे ७ कोटी,७७ लाख २० हजार ९९५ रुपयांची असून एकूण ९ कोटी २१ लाख ७८ हजार १५० रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर एकूण स्थावर मालमत्ता २८,४६,८०,००० आहे. शिंदेंच्या नावावर १३,३८,५०,००० कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे १५,०८,३०,००० आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावावर ५ कोटी २९ लाख २३,४१० रुपयांचं कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ९ कोटी, ९९ लाख, ६५ हजार ९८८ रुपयांचं कर्ज आहे.

अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'घरातला प्रत्येक माणूस, प्रत्येक लाडकी बहीण लाडका भाऊ रस्त्यावर उतरले आहेत. उत्साहाचे रूपांतर उत्सवात झाला आहे. यावर्षी लोकांचं प्रेम आणखी वाढलं आहे'. तर केदार दिघेंच्या उमेदवारीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले,' मतदार सुज्ञ असून योग्य निर्णय घेतील. विरोधकांकडे टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. आम्ही 2 वर्षात विकासाची काम केली आहेत. लाडकी बहीण योजना सुरू केली. महाराष्ट्राची जनता त्याची पोचपावती महाराष्ट्राची जनता देईल. मोठ्या बहुमताने महायुती जिंकेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Bitter Melon Juice: दररोज सुदृढ राहायचं आहे? मग रिकाम्या पोटी प्या 'हे' ज्यूस होतील अनेक फायदे

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT