बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि त्याच्याभोवती फिरणारा वाद काही नवा नाही. या वादात अनेक बड्या कलाकारांची नावे पुढे आली. तर, अनेक बिग बजेट चित्रपटांना या वादाचा फटका देखील बसला. असे म्हटले जाते की, स्टार किड्सना करिअर बनवण्यास फारशी अडचण नसते. आता स्टार किड्स म्हटलं कि, त्यांची शान वेगळीच, पैसा, श्रीमंती ओघाओघाने आलीच. असे अनेक स्टार किड्स आहे जे कमी वयातच कोट्यवधींचे मालक आहेत. त्यातलेच अलीकडे चर्चेत आलेलं नावं म्हणजे बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा. नव्या नवेली नंदा सध्या चर्चेत आहे तिच्या संपत्तीमुळं.
बिग बींची नात म्हटल्यावर नव्या अभिनयात पदार्पण करणार हे गृहीत धरलं गेलं होतं. पण, नव्यानं IIM अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. सिनेक्षेत्रात पदार्पण न करता नव्याने एक उद्योजिका आणि समाजसेविका म्हणून काम करणं पसंत केलं आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि, एक उद्योजिका नव्या नंदाने म्हणून चांगलं नाव कमावलं आहे. नव्या नंदा केवळ 26 वर्षांची आहे पण उद्योग क्षेत्रामध्ये तिला विशेष रस आहे. आपल्यातील उद्योग कौशल्ये आणखी चांगली करावीत, या उद्देशानं नव्याने अहमदाबादच्या 'इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट'मधून प्रवेश घेतला आहे.
नव्याची कौटूंबिक पार्श्वभूमीसुद्धा भक्कम आहे. तिचे वडील निखिल नंदा हे 'एस्कॉर्ट्स कबोटो लिमिटेड' या नामांकित इंजिनियरिंग फर्मचे चेअरमन आहेत. 'एस्कॉर्ट्स कबोटो लिमिटेड'चा टर्नओव्हर जवळपास 7000 कोटींहून अधिक आहे. याच कंपनीचं काम नव्याही पाहते.
तसंच वेगवेगळ्या बिजनेस व्हेंचर्समध्ये नव्याने गुंतवणूक केली आहे. हेल्थ केअर सेक्टरमध्येही नव्या अतिशय मनापासून कार्यरत आहे.
नव्या एका अलिशान घराची मालकीणही आहे. बिग बींचा 'प्रतीक्षा' हा मोठा आलिशान बंगला त्यांनी आपली मुलगी श्वेता नंदा हिच्या नावे केला आहे. त्यामुळेच आई श्वेता नंदा यांच्यासोबतच नव्या नंदा 'प्रतीक्षा'ची वाटेकरी आहे. या व्यतिरिक्त मुंबई, दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी नव्याच्या नावानं प्रॉपर्टी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.