बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणजेच अभिनेता शाहरूख खान कायमच चर्चेत राहतो. अभिनेता शाहरूख खानचे 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' हे तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. अभिनेता शाहरूख खान हा सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांना मागे टाकत सर्वाधिक कर भरणारा अभिनेता बनला आहे.
अभिनेता शाहरूख खान सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. माहितीनुसार, शाहरूख खानने 2024 या आर्थिक वर्षात 92 कोटी रूपये कर भरला आहे. दुसऱ्या स्थानावर तमिळ अभिनेता विजय थालापती आहे. विजयने 80 कोटी रूपयांचा कर भरला आहे. सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रेटीमध्ये अभिनेता सलमान खानचाही समावेश आहे. सलमानने 75 कोटी रूपयांचा कर भरला आहे. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 71 कोटी रूपयांचा कर भरला आहे. शाहरूख खानने टॉपच्या कलाकारांना मागे टाकले आहे. इंडस्ट्रीतल्या सर्वंच सेलिब्रेटींमध्ये अभिनेता शाहरूख खान सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे.
शाहरूख खानने 92 कोटींचा कर भरला आहे.
तमिळ अभिनेता विजयने 80 कोटींचा कर भरला आहे.
सलमान खानने 75 कोटींचा कर भरला आहे.
अमिताभ बच्चन यांनी 71 कोटींचा कर भरला आहे.
अजय देवगणने 42 कोटींचा कर भरला आहे.
रणबीर कपूरने 36 कोटींचा कर भरला आहे.
हृतिक रोशनने 28 कोटींचा कर भरला आहे.
कॉमेडियन स्टार कपिल शर्माने 26 कोटींचा कर भरला आहे.
करीना कपूरने 20 कोटींचा कर भरला आहे.
शहिद कपूरने 14 कोटींचा कर भरला आहे.
कियारा अडवाणीने 12 कोटींचा कर भरला आहे.
कतरिना कैफने 11 कोटींचा कर भरला आहे.
शाहरूख खानच्या संपत्तीबद्दल बोलायचे तर, अभिनेता सध्याच्या घडीला 7 हजार 300 कोटी रूपये संपत्तीचा मालक आहे. शाहरूख अनेक बिझनेसच्या माध्यमातून मोठी कमाई करतो. शाहरूख खानचं स्वत:च प्रोडक्शन हाऊस आहे. चित्रपटांसाठी शाहरूख खान मोठी रक्कम घेतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.