Baba Siddique Net Worth: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी संध्याकाळी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे पूर्व येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यात आला. गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या भयंकर घटनेने राजकीय वर्तुळासह बॉलिवूडमध्येही एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी हे राजकीय क्षेत्रासह बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध व्यक्तीमत्व होते. त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड जगतासह परदेशातील कलाकार हजेरी लावायचे. ४५ वर्षाची राजकीय कारकीर्द असलेल्या बाबा सिद्दीकी यांच्या आलिशान लाईफ स्टाईलचीही नेहमी चर्चा व्हायची. किती होती बाबा सिद्दीकी यांची एकूण संपत्ती? वाचा..
2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार बाबा सिद्दीकी यांनी आपली संपत्ती 76 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. यापूर्वी 2009 च्या निवडणुकीत त्यांची मालमत्ता 25 कोटी रुपये होती आणि 2004 च्या निवडणुकीत त्यांची मालमत्ता 12 कोटी रुपये होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार बाबा सिद्दीकी यांच्यावर 23.59 कोटी रुपयांचे कर्जही होते.
बाबा सिद्दीकी यांच्याकडे २०१४ साली मर्सिडीज बेंझ ए १८० स्पोर्ट होती, ज्याची किंमत ३१ लाख रुपये होती. तर त्यांच्या पत्नी शाहजीम सिद्दीकी यांच्याकडे मर्सिडीज बेंझ एस क्लास 350 एल होती, ज्याची किंमत त्यांनी 86.54 लाख रुपये असल्याचे सांगितले बाबा सिद्दीकी यांना लक्झरी कारचे शौकीन होते आणि मर्सिडीज व्यतिरिक्त त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीज आणि रोल्स रॉयस फँटम कार देखील होत्या.
बाबा सिद्दिकी आणि त्यांच्या पत्नीकडे 2014 साली 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने होते. बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे 4 कोटी रुपयांची व्यावसायिक मालमत्ता होती. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावर एक कोटी रुपयांची आणखी एक व्यावसायिक मालमत्ता आणि वांद्रे येथे 91 लाख रुपयांची आणखी एक व्यावसायिक मालमत्ता होती. बाबा सिद्दीकी यांच्या वांद्रे येथे 3 कोटी आणि 15 कोटी रुपयांच्या दोन निवासी मालमत्ता होत्या. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावर वांद्रे येथे 3 कोटी, 4 कोटी आणि 6 कोटी रुपयांची निवासी मालमत्ता आणि कलिना सांताक्रूझ पूर्व येथे 73 लाख रुपयांची निवासी मालमत्ता होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.