Crime News
Crime NewsSaam tv

Crime News : संतापजनक.. मामाकडून ४ वर्षीय भाचीवर अत्याचार; चाकण औद्योगिक परिसरातील धक्कादायक घटना

Chakan Pune news : कुटुंब बिहार येथील रहिवाशी असून पीडित मुलीचे वडिल एका खाजगी कंपनीत कामाला जातात
Published on

चाकण (पुणे) : सध्या राज्यभर महिला अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. याच दरम्यान चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण गावातील दवणेवस्ती येथे नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत मामानेच आपल्या चार वर्षीय चिमुकल्या भाचीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 

चाकण (Chakan) औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण परिसरात घटना घडली आहे. पीडित मुलीचे कुटुंब बिहार येथील रहिवाशी असून पीडित मुलीचे वडिल एका खाजगी कंपनीत कामाला जातात. नेहमीप्रमाणे ते कामावर गेले असताना घरात आईजवळ झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकल्या मुलीला तिच्या मामाने उठवून घराबाहेर नेले. (Crime News) तिला निर्जनस्थळी घेऊन जात जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करुन तिकडेच सोडुन दिले.  

Crime News
Rohit Pawar News : लाडकी बहीण योजना बंद नव्हे सुरूच ठेवणार; आमदार रोहित पवार यांच्याकडून योजनेचे कौतुक

संशयिताला घेतले ताब्यात 

घडला प्रकार मुलीने आईजवळ सांगितले. यानंतर आईने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी महाळुंगे पोलीसांनी नराधम संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान मामाकडून घडलेल्या या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com