Chief Minister Eknath Shinde: saam Tv
मुंबई/पुणे

CM Shinde:टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दिला जाणार विमा अन् मुलांना नोकरी

Bharat Jadhav

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. चालकांसाठी कल्याणकारी मंडळ निर्माण स्थापन केला असून त्यातून टॅक्सी, रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे.

राजकारणात येण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सु्द्धा रिक्षा चालक होते. बहुतेकवेळा स्वत: शिंदे यांनीही याचा उल्लेख केलाय. या टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांनी कल्याणकारी मंडळ निर्माण केली. लाखो टॅक्सी चालकांसाठी हे कल्याणकारी मंडळ काम करणार आहे. चालकाच्या कुटुंबाला विमा संरक्षण दिले जाईल. ज्यांची मुले आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनी सोबत एक करार केलाय. या महामंडळामध्ये तात्काळ दुखापत होईल, त्याला ५० हजार रुपये देण्याची तरतूद केलीय. ग्रॅच्युएटी दिली जाईल, यासाठी वर्षाला ३०० रुपये भरावे लागतील, अशी माहिती शिंदेंनी दिलीय.

दरम्यान यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. सरकारमध्ये असताना त्यांना बाळासाहेब यांच्याबद्दल काही करता आले नाहीये. परंतु आमचे सरकार त्यांच्या विचाराचे आहे. आमच्या सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने समृद्धी महामार्ग सुरू केला. ठाकरे यांचे स्मारक आम्ही युद्ध पातळीवर पुढे नेत आहोत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात त्यांचे व्होट शेअर ४२ टक्के आहे आणि आमचे ४८ टक्के आहे. लोक आमच्यासोबत आहेत, असा दावा शिंदेंनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण; फक्त कर्म चांगले ठेवा

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

SCROLL FOR NEXT