Ajit Pawar Program Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: बच्चू कडूंना न्याय द्या, अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ; प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राडा| VIDEO

Prahar Shetkari Sanghatana protest: पुण्यातील अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. जोरदार घोषणाबाजी करत बच्चू कडूंना न्याय द्या अशी मागणी या आंदोलनकांनी केली.

Priya More

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यक्रत्यांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात अमरावतीच्या शेतकऱ्यांनी गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी अजित पवारांचे भाषण सुरू होतात शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी बच्चू कडूंना न्याय द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. मोठ्या संख्येने महिला शेतकरी देखील यावेळी उपस्थित होत्या.

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यक्रत्यांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात अमरावतीच्या शेतकऱ्यांनी गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी अजित पवारांचे भाषण सुरू होतात शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी बच्चू कडूंना न्याय द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. मोठ्या संख्येने महिला शेतकरी देखील यावेळी उपस्थित होत्या.

प्रहार शेतकरी संघटनेचे नेते बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीपासून ते वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. तरी देखील सरकारकडून काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे बच्चू कडू यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यात कार्यक्रमक होता. या कार्यक्रमात अजित पवार भाषण करत असतानाच प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली.

बच्चू कडू यांना न्याय द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अशा घोषणा या आंदोलकांनी केल्या. यावेळी स्वारगेट पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आणि अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. प्रहार संघटनेच्या १० ते १५ कार्यकर्त्यांना स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अजित पवारांच्या कार्यक्रम स्थळाबाहेर या शेतकरी आंदोलकांनी ठिया मांडला असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

यावेळी भाषण करताना अजित पवारांनी सांगितले की, 'आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता आहे.' तसंच,'टोकाची भूमिका न घेता चर्चेतून मार्ग काढू.', असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. तर, अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधतला. त्यांनी कार्यकर्त्यांना दोन ते तीन तास थांबावे. आज दुपारी २ वाजता निर्णय घेईल, असे सांगितले. 'जर सरकारने निर्णय घेतला नाही तर १६ जूनला जलत्याग करू.', असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT