Amravati News
Amravati NewsSaam tv

Bachchu Kadu : बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन; प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक, अमरावती तहसीलदारांना कार्यालयात कोंडले

Amravati News : शेतकऱ्यांना कर्जमाफी व दिव्यांगांना मानधन यासह काही मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केले आहे. मात्र सरकारकडून अद्यापही तोडगा न निघाल्याने प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले
Published on

अमर घटारे 
अमरावती
: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन मिळावे; या मागणीसाठी बच्चू कडू यांनी मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची सरकारकडून अद्याप दाखल घेण्यात आली नसल्याने प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान वरुड येथे एका कार्यकर्त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तर अमरावती तहसीलदारांच्या दालनात घुसून आंदोलन करत तहसीलदारांना कोंडले आहे. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी व दिव्यांगांना मानधन यासह काही मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केले आहे. बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे. मात्र सरकारकडून अद्यापही तोडगा न निघाल्याने प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आत्ताच काही वेळापूर्वी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या तहसील कार्यालयात तहसीलदार विजय लोखंडे यांना त्यांच्या दालनात कोंडून ठेवले आहे. दुपारी प्रहारचे १५ ते २० कार्यकर्ते दालनात घुसले व त्यांनी दालन आतमधून बंद केले. तसेच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी वलगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. तर अंजनगाव सुर्जी येथे पाण्याच्या टाकीवर चढून कार्यकर्ते आंदोलन करत आहे. 

Amravati News
Pandharpur : आता अवघ्या तासाभरात विठ्ठल रुक्मिणी दर्शन; व्हीआयपी दर्शन बंद केल्याने दर्शन रांगेची गती वाढली

उमरगा शहरात रास्ता रोको आंदोलन

धाराशिवधाराशिवच्या उमरगा शहरात बच्चू कडू यांच्या अन्न त्याग उपोषणाच्या समर्थनात प्रहारकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; अशा मागण्या यावेळी आंदोलकांकडून करण्यात आल्या. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

Amravati News
Zp School : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटली; ३५ शिक्षक निलंबित, सीईओंची कठोर कारवाई

नांदेडच्या माळाकोळी येथे रास्ता रोको
नांदेड
:  शेतकरी कर्जमाफी यासह अन्य मागण्यासाठी बच्चू कडू यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला नांदेडमधून मोठा पाठिंबा मिळत आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे प्रहारचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी कावीळ नांदेड - लातूर महामार्ग रोखून धरला होता. बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com