Chandrashekhar Bawankule  Saam Tv
मुंबई/पुणे

Chandrashekhar Bawankule On Shivsena Advertisement: 'फडणवीस आणि शिंदे दोघेही चांगले बॅट्समन'; जाहिरातीच्या राजकारणावर चंद्रशेखर बावनकुळेंची सावध प्रतिक्रिया

Priya More

Shinde-Fadnavis: शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (BJP) जाहिरातीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. या जाहिरातीवरुन (Shivsena Advertisement) विरोधक शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका करत आहे. विरोधकांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'कुणाचं महत्त्व कुणामुळे कमी होत नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही चांगले बॅट्समन आहेत.', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'जाहिरातीवर न पडता डबल इंजिन सरकारचे काम सुरू आहे. राज्यात युतीचे सरकार आणि केंद्रात मोदी सरकार आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. कुणाचं महत्त्व कुणामुळे कमी होत नाही. मी कोणाला कमजोर समजलो तर तो कमजोर होत नाही. हा निर्णय जनता घेत असते. जनता पसंत करत असते. त्यामुळे जाहिरातीमध्ये सर्वेक्षणामध्ये आलेला पसंतीला अर्थ नसतो. निवडणुकीमध्ये काय पसंती मिळते याला जास्त अर्थ असतो.'

'देवेंद्र फडणवीस मागे पडले एकनाथ शिंदे पुढे गेले हा निष्कर्ष अर्थहीन आहे. शेवटी भाजप आणि सेना भाऊ म्हणून एकत्र काम करत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात येत नाही की एकनाथ शिंदेंना जास्त पसंती आहे. दोघेही चांगले बॅट्समन आहेत.', असे बावनकुळे यांनी सांगितले. तसंच, 'राज्यातील जनतेला काय हवं. सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता जनतेने हे सरकार दिले आहे. जाहिरातीवर न पडता डबल इंजिन सरकारचे काम सुरू आहे राज्यात युतीचे सरकार आणि केंद्रात मोदी सरकार आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.', असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, 'मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा नाव येत असलं तरी राज्यातील जनतेने दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केले आहे. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय कुठला निर्णय करत नाही. देवेंद्र फडणवीस देखील एकनाथ शिंदे त्यांच्या पुढे जात नाही. देवेंद्र फडणवीस मनातून ह्या विचारांचे आहेत ते कधी मुख्यमंत्र्यांशी स्पर्धा करत नाही.' तसंच, 'सरकार म्हणून एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत तर भाजप म्हणून देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. जाहिरातीबद्दल माझं कोणाशी बोलणं झालं नाही.', असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT