Rozgar Mela Today : ७० हजार युवकांना PM मोदींकडून मोठं गिफ्ट; सरकारी नोकरीची दिली नियुक्तीपत्रे

PM Modi News : देशातील ७० हजारांहून अधिक तरूणांना मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या तरूणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे दिली.
PM Modi News, Rozgar Mela Today
PM Modi News, Rozgar Mela Today SAAM TV
Published On

PM Modi distributes appointment letters : देशातील ७० हजारांहून अधिक तरूणांना मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या तरूणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे दिली. या तरुणांना सरकारच्या विविध विभागांत नियुक्त्या दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जवळपास ७० हजारांपेक्षा अधिक तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे वाटप केली. (Latest Marath News)

PM Modi News, Rozgar Mela Today
Shinde vs Thackeray : बैठक शिवसेनेच्या शिंदे गटाची, मात्र चर्चा उद्धव ठाकरेंची... बैठकीत नेमकं काय घडलं?

देशभरात ४३ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आली होती. या रोजगार मेळाव्यांतर्गत या सर्व नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. रोजगार मेळावे भरवणे ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे. त्याअंतर्गत पात्र उमेदवारांना तात्काळ आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय नियुक्तीपत्रे दिली जात आहेत.

रोजगार मेळावे येणाऱ्या काळात तरुणांना रोजगार देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी सरकारला आशा आहे. तसेच तरुणांना सशक्तीकरण आणि देशाच्या विकासात महत्वाचा वाटा उचलण्याची योग्य संधी प्राप्त करून देईल, अशीही अपेक्षा सरकारला आहे.

PM Modi News, Rozgar Mela Today
Shivsena Advertisement News : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे! शिवसेनेच्या जाहिरातीनं फडणवीसांचं टेन्शन वाढवलं

कोणकोणत्या विभागांत नोकरी

केंद्र सरकार आणि राज्य सरकारे सुद्धा रोजगार मेळाव्यांतर्गत तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील रोजगार मेळाव्यांत नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीची पत्रे दिली.

अर्थ विभाग, टपाल, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, कल्याण, रेल्वे मंत्रालय, लेखा विभाग, अणु ऊर्जा विभाग, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांसह विविध सरकारी विभागात नवनियुक्त उमेदवारांना ही नियुक्ती पत्रे देण्यात आली.

देशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. रोजगार मेळावा ही भाजप आणि एनडीए सरकारची वेगळी ओळख झाली आहे. अनेक राज्यांत रोजगार मेळाव्यांतर्गत नियुक्ती पत्रे दिली जात आहेत, असे ते म्हणाले. नियुक्तीपत्रे दिलेल्या तरुणांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोदींनी शुभेच्छा दिल्या.

मोदी म्हणाले की, 'एकीकडे जागतिक मंदी आली आहे. तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. मोठमोठ्या कंपन्या भारतात येऊ इच्छितात. अशात देशात येणाऱ्या काळात रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होईल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com