Ravikant Tupkar
Ravikant Tupkarsaam tv

Ravikant Tupkar News : 'स्वाभिमानी'चा धसका, AIC पिकविमा नरमली..! 16 जूनच्या आंदाेलनावर तुपकरांचे ट्विट

बियाणे व खताच्या कंपन्यांसोबत सरकारच साटलोटं आहे असे तुपकरांनी म्हटलं

Buldhana News : राज्यातील अनेक भागात बियाणे व खते तिप्पट भावाने विकल्या जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (swabhimani shetkari sanghatana ravikant tupkar) आक्रमक झाले आहेत. हा प्रकार प्रेताच्या टाळु वरील लोणी खाणे सारखं आहे असं तुपकर यांनी साम टीव्हीशी (saam tv) बाेलताना नमूद केले. ते म्हणाले तेलंगणा सरकारने पेरणीच्या तोंडावर 10 हजार रुपयांची मदत शेतक-यांना देऊ केली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने मदत करणे अपेक्षित आहे असेही तुपकर यांनी म्हटलं आहे. (Maharashtra News)

Ravikant Tupkar
Ashadi Ekadashi 2023 : टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांची पंढरपूरात गर्दी वाढू लागली, ऊन वारा पावसापासूनच्या संरक्षणासाठी पत्रा शेडची उभारणी

तुपकर पुढं बाेलताना म्हणाले सोयाबीन व कापसाला भाव नाही. 50 टक्के कापूस सोयाबीन शेतकऱ्याच्या घरात पडून आहे. अनुदानाच्या पैशाला बँकांनी होल्ड लावला आहे. बियाणे व खताच्या कंपन्यांसोबत सरकारच साटलोटं आहे हे स्पष्ट आहे.

सरकार थातुर्मातूर कारवया करत आहे म्हणजे तु मारल्या सारख कर, मी रडल्या सारख करतो असं सगळं सुरु आहे. सरकार व कृषिमंत्र्यांना हे महागात पडेल असा इशारा तुपकर यांनी सरकारला दिला आहे.

Ravikant Tupkar
Raju Shetti News : मुख्यमंत्र्यांचा आज कोल्हापूर दाैरा : राजू शेट्टींना एकनाथ शिंदेंचा फाेन, दोघांत झाली महत्त्वपूर्ण चर्चा

AIC पिकविमा नरमली..!

दरम्यान 16 जुनला एआयसी मुंबई कार्यालयाच्या 20 व्या मजल्यावरून उडी मारण्याच्या आंदाेलनावर रविकांत तुपकर ठाम राहिले आहेत. त्यांनी आज (मंगळवार) केलेल्या ट्विटमध्ये मुंबईच्या १६ जूनच्या आंदोलनाचा धसका AIC पिकविमा नरमली..! असे म्हटलं आहे.

आंदोलनावर ठाम

तुपकर लिहितात १५ जून पर्यंत ७० कोटी रुपये टाकण्याचे मला लेखी पत्र प्राप्त झाले आहे. त्याचे छायाचित्र पाेस्ट करीत तुपकरांनी पैसे खात्यात जमा होत नाही तोवर विश्वास नाही आम्ही आंदोलनावर ठाम आहाेत असे म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com