Mumbai Local Train x
मुंबई/पुणे

Railway News: रेल्वे प्रवाशांची लवकरच गर्दीतून सुटका, १५ डब्यांची लोकल धावणार; मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान

Mumbai Local Train: ठाणेकरांसाठी गुड न्यूज आहे. ठाण्यातून लवकरच १२ ऐवजी १५ डब्यांची लोकल धावणार आहे. यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून २, ३ आणी ४ या रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी आणि रूंदी वाढवण्याचे काम सुरू आहे.

Priya More

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाटाची लांबी वाढवण्यात येणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २, ३ आणि ४ ची लांबी वाढवली जाणार आहे. नवीन वर्षामध्ये ठाणे रेल्वे स्थानकावरून १२ ऐवजी १५ डब्यांची लोकल धावणार आहे. त्यामुळे ठाण्यातून मुंबई आणि कर्जत- कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २, ३ आणि ४ ची लांबी वाढणार आहे. प्रवाशांची गर्दी आणि लोकलवरील वाढता ताण लक्षात घेता फलाटाची लांबी वाढवण्यात येणार आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मवरून आता १२ डब्यांच्या ऐवजी १५ डब्यांची लोकल धावणार आहे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा अंदाज पाहता मध्य रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ ची रुंदी १६.१५ मीटरने वाढण्यात येणार आहे. तर फलाट क्रमांक ३ आणि ४ ची रुंदी ४० मीटरने वाढण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून डिसेंबर २०२५ पर्यंत ही कामं पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्याचा प्रवास गर्दीमुक्त होण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, मे २०२४ मध्ये ठाणे रेल्वे स्थनकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ चे मॉड्युलर फलाटाच्या मदतीने रुंदीकरण करण्यात आले होते. फलाट क्रमांक ५ आणि ६ हा अतिवर्दळीचा असल्यामुळे त्याची रुंदी वाढवण्यात आली होती. या फलाटाची रुंदी आधी १० मीटर होती ती १३ मीटर करण्यात आली होती.

ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. या रेल्वे स्थानकावरून रोज ५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. प्रवासांची संख्या वाढत चालल्यामुळे गर्दीच्या वेळी याठिकाणावरून प्रवास करणं कठीण जाते. लोकलमध्ये गर्दी जास्त असल्यामुळे अनेकदा प्रवाशांना चढता येत नाही.

त्यामुळे ३ ते ४ लोकल सोडाव्या लागतात त्यानंतर त्यांना लोकल मिळते. त्यात लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे प्रवाशांना दरवाजाला लटकत प्रवास करावा लागतो. जर याठिकाणावरून धावणाऱ्या लोकल १२ ऐवजी १५ डब्याच्या झाल्या तर प्रवाशांचा गर्दीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी शहरातील उपनगरात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: जे पेरलं त्याची फळं मिळत आहेत, ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर घणाघात

PM Kisan Yojana: पीएम किसानचा २१वा हप्ता जमा; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० आले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Success Story: नासामधील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली, यूपीएससी दिली; पाचव्या प्रयत्नात IPS; अनुकृति शर्मा यांचा प्रवास

White Tongue: जीभ पांढरी दिसतेय? दुर्लक्ष करू नका; वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

SCROLL FOR NEXT