Central Railway Power Block. X (Twitter)
मुंबई/पुणे

Central Railway : बदलापूर-कर्जतदरम्यान लोकल बंदच, मध्य रेल्वेचा रविवारी ३ तास स्पेशल ब्लॉक

Badlapur Karjat Central Railway : रविवार ३० मार्च रोजी मध्य रेल्वेवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. यामुळे मध्य रेल्वेवर विशेष पॉवर ब्लॉक असणार आहे. यामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यान लोकल ३ तास बंद राहणार आहेत.

Yash Shirke

Central Railway Power Block : मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ स्टेशनवर रविवार ३० मार्च रोजी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मुंबई विभागातर्फे ३० मार्च रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० पर्यंत ब्लॉक परिचालीत करणार आहे.

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे संचालन:

बदलापूर आणि कर्जत स्थानकांदरम्यान सकाळी ११.३० ते दुपारी २.३० पर्यंत उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

खालील उपनगरीय गाड्या बदलापूर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होतील.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.५७ वाजता सुटणारी (एस-१७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कर्जत लोकल.

- टर्मिनस येथून १०.३६ वाजता सुटणारी (एस-१९) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.१४ वाजता सुटणारी (एस-२१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कर्जत लोकल.

- ठाणे येथून १२.०५ वाजता सुटणारी (टीएस-५) ठाणे-कर्जत लोकल.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.२० वाजता सुटणारी (केपी-५ ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - खोपोली लोकल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० वाजता सुटणारी (एस-१५) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होईल.

खालील उपनगरीय गाड्या बदलापूर स्थानकावरून शॉर्ट ओरिजिनेट होतील.

- कर्जत येथून सकाळी ११.२५ वाजता सुटणारी (एस-२६) कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल.

- कर्जत येथून १२.०० वाजता सुटणारी (एस-२८) कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल.

- कर्जत येथून दुपारी १२.२३ वाजता सुटणारी (एस-३०) कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल.

- कर्जत येथून दुपारी १.०० वाजता सुटणारी (एस-३२) कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल.

- कर्जत येथून दुपारी १.२७ वाजता सुटणारी (टीएस-२) कर्जत - ठाणे लोकल.

कर्जत येथून दुपारी १३.५५ वाजता सुटणारी (एस-३४) कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ स्थानकावर शॉर्ट ओरिजिनेट होईल.

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्शन

कल्याण येथे प्रवाशांच्या चढ-उतरण्याच्या सोयीसाठी खालील गाड्या कर्जत -पनवेल मार्गावरून वळवल्या जातील तसेच पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबे दिले जातील.

- ट्रेन क्रमांक 11014 कोइम्बतूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,

- ट्रेन क्रमांक 12164 चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,

- ट्रेन क्रमांक 12493 मिरज - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस.

डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन

- गाडी क्रमांक 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एक्सप्रेस दुपारी २.११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत वांगणी स्टेशनवर नियमित केली जाईल.

- ट्रेन क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस- काकीनाडा एक्सप्रेस १५ ते २० मिनिटे उशिराने चालेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT