Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

Cabinet Expansion: मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख समोर, शिंदे खासदारांसह दिल्ली दौऱ्यावर; कुणाला मिळणार मंत्रिपद?

Delhi Meeting Sparks Cabinet Expansion Talks: येत्या १७ जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असून ते अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

Priya More
  • १७ जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

  • एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार दिल्लीला रवाना

  • एकनाथ शिंदे हे अमित शाह यांची भेट घेणार

  • श्रीकांत शिंदे यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या शक्यतेची जोरदार चर्चा

सूरज मसूरकर, मुंबई

येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काल पहिल्यांदाच भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये विनोद तावडे यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीच्या चर्चेनंतर कालच्या कोअर कमिटीच्या बैठकीला महत्त्व आलं होतं. या बैठकीत अनेक बडे नेते उपस्थित होते. बैठकीतल्याच एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याने 'आगे आगे देखो होता है क्या? खूप साऱ्या घडामोडी घडतील', अशी माहिती देखील दिली. अशातच आज शिवसेनेचे सर्व खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

येत्या १७ जुलैला केंद्रीय मंत्रीपदामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड होऊ शकते. काही नेत्यांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागू शकते. त्यात शिवसेनेच्या वाटेला एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळू शकते. त्यामुळे ज्याअर्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत जाण्याची चर्चा, काल कोअर कमिटीच्या बैठकीत विनोद तावडे यांची उपस्थिती, तावडे हे एक हा मराठा चेहरा आहे आणि आजच्या दिल्लीतल्या घडामोडी त्यामुळे येत्या १७ तारखेला काय नेमकं राजकीय समीकरण बनतं हे पाहणं महत्त्वाचं राहिल.

येत्या १७ जुलैला केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना शिंदेगटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय कॅबिनेटच्या मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. आज संध्याकाळी ४ वाजता खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या खासदारांसह चार्टड विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत. आज रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणार आहे.

शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ठाकरेसेनेतून शिंदेसेनेत आलेल्या सहाही खासदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. या मंत्रिपदासाठी त्यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदरा संजय जाधव यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अशात राज्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं देखील महत्वाचे राहिल. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदेंची जी बैठक होणार आहे. यामध्ये काय होतंय ते पाहणं महत्वाचे राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT