Maharashtra Politics: मोठी बातमी! जयंत पाटील यांना मोठा धक्का, नगराध्यक्षांनंतर नगरसेवक अपात्र

Big Blow to Jayant Patil: सांगलीमध्ये जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय नगराध्यक्षांनंतर आता नगरसेवकाला जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्र ठरवण्यात आले आहे.
Maharashtra Politics: मोठी बातमी! जयंत पाटील यांना मोठा धक्का, नगराध्यक्षांनंतर नगरसेवक अपात्र
Jayant PatilSaam tv
Published On
  • सांगलीत जयंत पाटील यांना मोठा धक्का

  • इस्लामपूरच्या नगराध्यक्षांनंतर नगरसेवक अपात्र

  • सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

  • राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

सांगलीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. ईश्वरपूर नगराध्यक्षांचे पद अपात्र ठरवल्यानंतर नगराध्यक्ष यांच्या बंधूंचे नगरसेवक पद देखील अपात्र ठरवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी याबाबतचा निर्णय दिला आहे. ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचे बंधू सुनील मलगुंडे यांना देखील अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे हा जयंत पाटील यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

अतिक्रमण आणि बांधकाम अनियमित याबाबत असणाऱ्या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला आहे. त्यांनी थेट सुनील मलगुंडे यांचे नगरसेवक पत्र अपात्र असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना शिंदे गटाचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष जयकुमार उर्फ घनश्याम जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.

Maharashtra Politics: मोठी बातमी! जयंत पाटील यांना मोठा धक्का, नगराध्यक्षांनंतर नगरसेवक अपात्र
Poilitical Crisis News : पक्ष कार्यालय अजित पवार गटाचच Hasan Mushrif यांचे विधान

२ दिवसांपूर्वी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पद अपात्र ठरवलं होतं. त्यापाठोपाठ नगराध्यक्षांचे बंधू आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांना देखील अपात्र ठरविण्यात आले आहे. दोन दिवसांत एकापाठोपाठ नगराध्यक्ष आणि नगरसेवक असणाऱ्या मलगुंडे बंधूंच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! जयंत पाटील यांना मोठा धक्का, नगराध्यक्षांनंतर नगरसेवक अपात्र
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com