नगरसेवक, नेते नव्हे तर अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन; राजकारणात खळबळ

Delhi Politics : दिल्लीत एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. एका संपूर्ण राजकीय पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण झाले आहे. या निर्णयामुळे आगामी महत्त्वाच्या राजकीय लढतींच्या पार्श्वभूमीवर भाजपची स्थिती अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे.
Delhi Politics :
A major political realignment unfolds as an entire party joins BJP, triggering fresh discussions in national politics.saam tv
Published On
Summary
  • दिल्लीत मोठी राजकीय घडामोड; अख्खा पक्ष भाजपमध्ये विलीन.

  • भाजपची ताकद वाढवणारा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय.

  • महापालिका आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विलीनीकरणाला महत्त्व.

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला. त्यांच्या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. पण त्याचवेळी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भाजप लोकसभेत आपल्या खासदारांची संख्या वाढवण्यासाठी इतर पक्षांतील खासदारांना मंत्रिपदाचं प्रलोभन दाखवत त्यांना भाजपमध्ये खेचत आहेत.

Delhi Politics :
Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

दिल्ली मात्र मोठी राजकीय घडामोड झाली असून अख्खा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला आहे. दिल्लीतील सत्ता मिळवल्यानंतर भाजपने महापालिकेवरही वर्चस्व मिळविण्यासाठी कंबर कसली असून त्याच पार्श्वभूमीवर भाजपने नेते, नगरसेवक न फोडता अख्खा पक्षच आपल्यासोबत आणला आहे.

आम आदमी पक्षातून १४ महिन्यांपूर्वी बाहेर पडत १६ नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी या पक्षाची स्थापना केली. आता या सर्व १६ नगरसेवकांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केलाय. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करण्यात आलं. त्यामुळे महापालिकेत भाजपची ताकद वाढलीय.

Delhi Politics :
UP Politics: मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये नाराजी उफाळली? माजी खासदाराच्या विधानाने खळबळ

दिल्लीत मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुकीत आपचा दारूण पराभव झाला होता. पक्षाच्या हातून सत्ता गेल्यानंतरच तीनच महिन्यांत १६ नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडली आणि त्यांनी नवा पक्षा स्थापन केला होता. परिणामी आपच्या हातून महापालिकेची सत्ताही गेली. आता पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर १६ नगरसेवकांनी भाजपमध्ये विलीन होत तिकीट पक्के केल्याचे मानले जातय.

आयव्हीपी पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याने भाजपच्या नगरसेवकांचा आकडा १३९ वर पोहोचलाय. दिल्ली महापालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या २५० एवढी आहे. त्यामुळे आता भाजपकडे एकहाती बहुमत आलंय. यापूर्वी भाजपच्या नगरसेवकांची संख्या १२३ होती. तर २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी भाजपचे केवळ १०४ नगरसेवक निवडून आले होते. आम आदमी पक्षाने त्यावेळी विजय मिळवत सत्ता काबीज केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com