

तेज प्रताप यादव यांनी बिहार सरकार कोसळण्याचा दावा केला.
भाजप आणि जेडीयूमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले.
बांकीपूर पोटनिवडणुकीतील उमेदवार बदलामुळे राजकीय चर्चा रंगल्या.
बिहारमधील राजकारणात मोठा वादळ उठण्याची शक्यता आहे. सरकारमधील असलेले मित्र पक्ष म्हणजे भाजप आणि जेदयू मध्ये आलबेल नसल्याचं बोललं जातंय. याचदरम्यान जनशक्ती जनता दलाचे (JJD) राष्ट्रीय अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
तेज प्रताप यांनी केलेल्या दाव्यानुसार, बिहारमधील सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. बांकीपूरमधील भाजपचे उमेदवार अभिषेक सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला असतानाच त्यांनी हे विधान केलंय. भाजपने आता या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी नीरज कुमार यांची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. त्यावरून तेज प्रताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
शुक्रवारी (१० जुलै २०२६) संध्याकाळी तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या 'एक्स' (X) हँडलवर पोस्ट करत म्हटलं की, "बिहारमधील सरकार लवकरच पडणार आहे आणि नितीश कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना 'सम्राट' म्हणून संबोधत त्यांना फटकारले आहे. मी तुम्हाला हे सांगितले होते; मी याचे भाकीत केले होते. मी सध्या वृंदावनमध्ये आहे आणि बिहारमधील सरकार लवकरच बदलेल."
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आज एनडीएची बैठक बोलावली होती. या बैठकीला आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. ही बैठक विशेष महत्त्वाची होती कारण 'बांकीपूर' या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. हा मतदारसंघ भाजप नेते नितीन नवीन यांचा आहे. बिहार भाजपच्या अध्यक्षांनी एनडीए (NDA) बैठकीबाबत माहिती दिलीय.
संजय सरावगी म्हणाले, "सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली 'लोक सेवक आवास' येथे आयोजित एनडीएच्या बैठकीला आपण संबोधित केलं. यामध्ये बिहारचा सर्वांगीण विकास, राज्य सरकारद्वारे राबविल्या जाणाऱ्या जनहितार्थ योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विकासकामांना गती देणे, सुशासन बळकट करणे आणि सरकारच्या कामगिरीची माहिती सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.