मुंबई पुन्हा हादरली! तीन मजली बांधकाम कोसळलं, 3 जण अडकले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Mankhurd Building Collapsed: मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमध्ये तीन माळ्याचे बांधकाम कोसळलं आहे. या घटनेत ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Heavy Rain Triggers Building Collapse in Mumbai's Mankhurd
Heavy Rain Triggers Building Collapse in Mumbai's Mankhurd
Published On

मुंबईतील मानखुर्द येथील निर्मणाधीन तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यात चार अडकले असून त्यातील ३ तिघांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी अग्निशामक दल आणि बचाब पथक दाखल झाले आहे. तर भाजपचे नगरसेवक नवनाथ बन देखील तेथे आले आहेत. मानखुर्दमधील जनता नगरमधील हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या चाळ क्रमांक ५ मध्ये तीन मजली इमारतीचं बांधकाम केलं जातं होतं. त्यावेळी इमारतीचा काही भाग अचानक कोसळला.

Heavy Rain Triggers Building Collapse in Mumbai's Mankhurd
Navi Mumbai: बेलापूरमध्ये दरड कोसळली, रस्त्यावर माती अन् दगडांचा ढिग; खारघरकडे जाणारी वाहतूक वळवली, पाहा VIDEO

या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाने रात्री ९:०७ वाजता याला 'लेव्हल-१' (L-1) ची घटना म्हणून घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बीएमसीचे (BMC) कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाची पथके शोध आणि बचाव कार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Heavy Rain Triggers Building Collapse in Mumbai's Mankhurd
Maharashtra Rainfall : मान्सूनचा राज्यातून निरोप, पण वादळी पावसाचा इशारा; पुढचे ४ दिवस धो-धो कोसळणार

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे परिसरात घबराट पसरली. स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यात गुंतलेल्या पथकांना सहकार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसरातील वाहतूक बंद केली आहे. मुंबईतील मानखुर्द परिसरात तीन मजली बांधकाम कोसळले आहे. या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकलेत. मात्र आता या घटनेत 6 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com