Operation Tiger: ऑपरेशन टायगर ३.०, ठाकरेंचे आणखी १५ आमदार फुटणार; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा

Athawale Predicts Fresh Split in Uddhav Thackeray Camp: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांचे आणखी १५ आमदार फुटण्याचा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे.
Operation Tiger: ऑपरेशन टायगर ३.०, ठाकरेंचे आणखी १५ आमदार फुटणार; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
Uddhav Thackeray newssaam tv
Published On
  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठा दावा केला

  • ठाकरे गटातील १४ ते १५ आमदार पक्ष सोडून जाऊ शकतात असे विधान त्यांनी केले

  • या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले

  • ठाकरेंचे आधीच ६ खासदार आणि एक आमदार फुटला आहे

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरेंचे ६ विश्वासू खासदार आणि एका आमदाराला फोडले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी काही आमदार-खासदार सोडून जाणार असल्याचे दावे सत्ताधाऱ्यांकडून वारंवार केले जात आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटात आणखी एक मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आणखी १४ ते १५ आमदार फुटणार असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी सांगितले की, 'उद्धव ठाकरे यांचे अनेक आमदार पक्ष सोडू शकतात. ठाकरे गटाचे निम्म्याहून जास्त आमदार म्हणजे १४ ते १५ आमदार फुटणार आहे.' पण रामदास आठवले यांनी नेत्यांची नावे किंवा तारखा सांगितल्या नाहीत. जर रामदास आठवले यांनी केलेला दावा खरा ठरला तर अलीकडच्या काळात पक्षातील ही तिसरी फूट असेल. यापूर्वी खासदार आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या नेत्याने पक्ष सोडला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता.

Operation Tiger: ऑपरेशन टायगर ३.०, ठाकरेंचे आणखी १५ आमदार फुटणार; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

रामदास आठवले यांनी सांगितले की, सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या २० आमदारांपैकी आणखी १४ ते १५ आमदार फुटूण्याची शक्यता आहे. दर त्यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांचे स्वागत केले जाईल. खासदार आणि आमदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता नगरसेवक यांना वाचवण्यासाठी रणनिती आखली आहे. मोठ्या पक्षांतराच्या अफवांदरम्यान ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे.

Operation Tiger: ऑपरेशन टायगर ३.०, ठाकरेंचे आणखी १५ आमदार फुटणार; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

नाशिक महानगरपालिकेचे सुमारे १२ नगरसेवक शिवसेना शिंदेगटाच्या संपर्कात असल्याच्या वृत्तांनंतर त्यांनी तातडीने आपले संकटमोचक रवींद्र मिरलेकर यांना नाशिकला पाठवले. पक्षात संभाव्य फूट टाळण्यासाठी मिरलेकर यांनी शनिवारी सर्व नगरसेवक आणि संघटनेच्या अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक बोलावली आहे. सूत्रांनी असे देखील सांगितले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील सुमारे १० आमदारांच्या संपर्कात आहे. ज्यांना बाजू बदलून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मनवले जात आहे.

Operation Tiger: ऑपरेशन टायगर ३.०, ठाकरेंचे आणखी १५ आमदार फुटणार; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com