Ramdas Athawale : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदीबद्दल भूमिका घेणे हे बरोबर नाही - रामदास आठवले

Ramdas Athawale Statement on Hindi Language: हिंदी सक्तीच्या मुद्यावरुन राज्यात तणाव सुरु आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र विरोध केला आहे.
Ramdas Athawale Statement on Hindi Language
Ramdas Athawale Statement on Hindi Languagex
Published On

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा अलवंब करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या एकूण मुद्द्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'मला असं वाटतं, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्रिभाषा सर्वांना यायला हवी. हिंदी आणि इंग्रजी देखील बोलता येणे आवश्यक आहे. मराठी ही आपली भाषा आहेतच, आम्हाला सर्वांना देखील मराठीचा अभिमान आहे. मराठी भाषेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळेच विषय शिकवा अशा पद्धतीचा कुठलाही आदेश नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने त्याला नकार देणे बरोबर नाही', असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले.

Ramdas Athawale Statement on Hindi Language
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर, राजकीय वर्तुळात उडणार खळबळ

केंद्र राज्यमंत्री म्हणाले, 'सरकारने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या दबावात येता कामा नये. उद्धव आणि राज यांनी हिंदीबद्दल भूमिका घेणे बरोबर नाही. ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान विरुद्ध भूमिका आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी योग्य तो निर्णय घ्यावा आमचा पक्ष त्यांच्यासोबत आहे. मराठी हा मुद्दा घ्यायला काही हरकत नाही. पण महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर हिंदी बोलावं लागतं. आम्ही शाळेत शिकत असताना त्यावेळेस इंग्रजी विषय होता. मी परदेशात गेलो, तर त्या ठिकाणी इंग्रजी भाषा शिवाय पर्याय नाही.'

Ramdas Athawale Statement on Hindi Language
Pune Politics : पुण्यात महायुतीमध्ये धुसफूस सुरुच, शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये युद्ध पेटलं

'आपण सगळे मराठी आहोतच पण हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्याने तिचा अवमान होता कामा नये. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबईसारख्या ठिकाणी बहुभाषिक लोक राहतात. अनेक राज्यातील मुल देखील मुंबईत मराठीत बोलतात, मी त्यांना पाहिलं आहे. राष्ट्रभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे', असे रामदास आठवले म्हटले.

Ramdas Athawale Statement on Hindi Language
Train Ticket Booking Tips : चाकरमान्यांनो… गणपतीला गावाला जाताय? तिकीट बुक करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com