
अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Pune : महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतरही रवींद्र धंगेकरांचे हेमंत रासने यांच्यावर हल्ले सुरुच आहेत. पोलीस अधिकारी विनयभंग प्रकरणात आमदार हेमंत रासने यांनाही सहआरोपी करावे अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्ताकडे केली आहे. या प्रकरणामुळे महायुतीमध्ये गेल्यानंतरही रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात संघर्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील अधिकारी असेलल्या प्रमोद कोंढरेने दोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरात एका पोलीस अधिकारी महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रमोंद कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडला. रासने यांनी प्रमोद कोंढरेला समज देणे आवश्यक होते. पण असे काहीही घडले नाही. त्यामुळे या प्रकरणात हेमंत रासने यांना देखील सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने या दोन्ही नेत्यांच्या मधील शीत युद्ध याआधी अनेकवेळा पाहायला मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत रविंद्र धंगेकर काँग्रेसकडून होते, तर महायुतीकडून रासने यांनी निवडणूक लढवली. या वेळी सुद्धा या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी सोशल मिडियापासून ते पोस्टर वॉरपर्यंत वाद रंगले. निवडणूक झाल्यानंतर रासने यांनी विजय मिळवला. यानंतर काही दिवस या दोन्ही नेत्यांमध्ये काही वाद झालेले दिसले नाही.
काही महिन्यांपूर्वी रविंद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याचाच अर्थ रवींद्र धंगेकर हे आता महायुतीमध्ये आहेत. असे असताना सुद्धा त्यांनी रासने यांच्यावर टीका करायला थांबवलेलं नाही. आता कोंढरे यांच्या प्रकरणात सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्यावर टीका केलीय आणि इतकचं नाही तर त्यांना सहआरोपी करा अशी अजब मागणी केली आहे. त्यामुळे पुण्यात महायुती मध्ये संघर्ष आहे का असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.