Pune Metro New Scheme:  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro Rename: ठरलं तरं! पुण्यातील ३ मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यात येणार, कोणकोणत्या स्टेशनचे होणार नामांतर? जाणून घ्या सविस्तर...

Pune Metro Latest News: पुणे शहरातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. ही नामांतराची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ३ सप्टेंबर २०२४

Pune Metro Station Name Change: पुणे शहरातील अनेक मेर्टो स्थानकांच्या नावाला आक्षेप घेण्यात आला आहे. शहरातील काही मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केल्या अनेक दिवसांपासून होत आहे. याबाबत आता एक महत्वाची बातमी समोर आली असून पुणे शहरातील तीन स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोणत्या स्थानकांची नावे बदलणार आहेत? जाणून घ्या सविस्तर...

पुण्यातील मेट्रो स्थानकांची नावे बदलणार..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. ही नामांतराची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. शहरातील बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या तीन स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत.

जाणून घ्या नवी नावे..

या नामांतरानंतर बुधवार पेठ स्थानकाचे नाव कसबा पेठ स्थानक, मंगळवार पेठ स्थानकाचे नाव आरटीओ स्थानक आणि नाशिक फाटा स्थानकाचे नाव कासारवाडी असे करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तसेच सिव्हिल कोर्ट स्थानकाचे नाव शिवाजीनगर जिल्हा न्यायालय करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी केली. स्वारगेट मेट्रो स्टेशन हे भूमिगत असून मल्टी मॉडेल हब म्हणून ओळखलं गेलं आहे. अत्यंत अत्याधुनिक आणि अद्यावत पध्दतीने हे मेट्रो स्टेशन लवकरच प्रवशांसाठी खुलं करण्यात येईल तसेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे देखील भूमिपूजन सोहळा पार पडेल असा विश्वास केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी वर्तवला.

तसेच पुणे मेट्रोसाठी २ मार्ग आहेत. एक मार्ग पूर्ण झाला आहे, वनाज ते रामवाडी १५ किमी अंतर पूर्ण झालं आहे. पी सी एम सी ते स्वारगेट याचं काम ९० टक्के पूर्ण झालं आहे. शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट, स्वारगेट. यांच्या तांत्रिक परवानगी झाल्यावर काहीच दिवसात हे स्टेशन सुरू होईल. कसबा पेठ, मंडई या स्टेशन ची कामं पूर्ण झाली आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, २०२२ पासून म्हणजेच पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर स्थानकांच्या नावात बदल करण्याची मागणी होऊ लागली होती. पुण्यातील सिव्हील कोर्ट, शिवाजीनगर, मंगळवार पेठ, बुधवार पेठ या स्थानकांच्या नावात बदल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

Success Story: IAS व्हायचं म्हणून गावकऱ्यांनी खिल्ली उडवली, सुलोचना डगमगली नाही; हिम्मतीनं UPSC क्रॅक केली अन् कलेक्टर झाली, वाचा सक्सेस स्टोरी

Muslim Reservation: मुस्लीम समाजाला मोठा धक्का; मुस्लीम आरक्षण फडणवीसांकडून रद्द

Relationship Tips: हे ५ संकेत दिसले तर समजा तुमचा पार्टनर ब्रेक-अप करण्याचा विचार करतोय

SCROLL FOR NEXT