Maratha Reservation Saam Digital
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मोठी बातमी! मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेंना नोटीस; आंदोलनाला परवानगी नाकारली

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आजाद मैदान, शिवाजी पार्कसाठी परवानगी नसल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Manoj jarange Patil News:

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्कसाठी परवानगी नसल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी करत लाखो बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटील यांच्या मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून सध्या ते लोणावळ्यात आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेंना नोटीस पाठवण्यात आली आहे.

मराठा आंदोलनाचा विपरित परिणाम होऊन मुंबईचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्याचबरोबर मराठा आंदोलनामध्ये सहभागी लोकांची संख्या पाहता तेवढ्या क्षमतेचे कोणतेही मैदान नाही. त्यामुळे जरांगे यांना आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान ठीक राहील, अशा सूचना या नोटीसीमधून देण्यात आल्या आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आझाद मैदानामध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार ५०००ते ६००० इतक्याच लोकांना आंदोलन करण्याची क्षमता आहे. परंतु त्यापेक्षा जास्त लोक आल्यास तेथे सोई- सुविधा नाहीत. तसेच शिवाजी पार्क मैदानावर २६ जानेवारीचा कार्यक्रम असल्याने तेथे कार्यक्रम घेता येणार नाही, असे या नोटीसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऍडव्होकेट सतीश मानेशिंदे या नोटिशीला उत्तर देणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT