Manoj Jarange Morcha: भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर धडकणार; मनोज जरांगेच्या यात्रेचा मार्ग बदलला, नागरिकांनी 'या' मार्गावरुन जाणे टाळा

Traffic And Manoj Jarange Morcha: मनोज जरांगे पाटील त्यांच्या एक लाख मराठा बांधवांसह मुंबईत पोहोचत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहतुक कोंडी होत आहे. हे टाळण्यासाठी मराठा आंदोलकांनी त्यांचा रस्ता बदलला आहे.
Manoj Jarange Morcha Route
Manoj Jarange Morcha RouteGoogle
Published On

Manoj Jarange Morcha Route

मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक आज मुंबईत पोहोचणार आहे. काल पुणे शहर ओलांडण्यासाठी त्यांना १२ तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता. त्यामुळं बुधवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. (maratha reservation latest news)

आज वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी मोर्चा आयोजकांनी त्यांच्या मार्गात बदल केला आहे, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक (एसपी) सोमनाथ घार्गे यांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'असा' आहे मार्ग

आता मराठा आंदोलक आणि त्यांची वाहने NH48 या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करणार आहे. त्यानंतर ते शेडुंग टोल प्लाझापर्यंत पोहोचणार आहेत. गुरुवारी सकाळी ते कळंबोलीत न येता गव्हाण फाटा ओलांडून सायंकाळी पाम बीच रोडने बेलापूर जंक्शन येथे पोहोचणार (Morcha Route) आहे. मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक शुक्रवारी एपीएमसी परिसरात रात्र काढणार आहेत. शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानातून ते मोर्चाला सुरुवात करणार आहेत.

आज कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर येथून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार नाही. मोर्चा एक्स्प्रेसवे ऐवजी मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करणार (Manoj Jarange Morcha) आहे. खंडाळा घाट विभागात 6 किमीचा रस्ता आहे, या मार्गावर दोन्ही बाजुने वाहतुक सुरू असणार आहे, असं एचएसपी पुणे युनिटच्या एसपी लता फड यांनी सांगितलं आहे.

'अशी' करणार वाहनांची व्यवस्था

कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर येथून येणारी अवजड वाहने ई-वेच्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी थांबवली जातील. मोर्चा खंडाळा घाटातून पुढे गेल्यानंतर वाहनांना टप्प्याटप्प्याने पुढे जाण्यास परवानगी दिली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एक्स्प्रेसवेचा पुण्याकडे जाणारा कॉरिडॉर अवजड वाहनांसाठी खुला असणार (Traffic And Manoj Jarange Morcha) आहे.

दोन्हीकडून येणाऱ्या हलक्या मोटार वाहनांच्या वाहतुकीवर कोणतंही बंधन नसेल. खंडाळ्याच्या बाहेर मुंबई-पुणे महामार्गाकडे बॅरिकेड्स लावले जाणार आहेत. अवजड वाहनांना परवानगी दिली जाणार नाही, असं सहाय्यक निरीक्षक सुमैया बागवान यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com