Borivali-Dahisar Youth Falls from Local Train Saam Tv news
मुंबई/पुणे

Mumbai Local Accident : ३ दिवसांपूर्वी मुंब्रा, आज बोरीवली-दहिसरमध्ये घटना; धावत्या लोकलच्या दरवाजातून तरुण पडला

Borivali-Dahisar Youth Falls from Local Train : पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली-दहिसर दरम्यान एक तरुण चालत्या लोकलमधून खाली पडल्याचं समोर आलं आहे. हा तरुण काही कामानिमित्त बाहेर जात होता.

Prashant Patil

बोरिवली : मुंब्रा लोकल अपघातानंतर संपूर्ण मुंबई सुन्न झालीय. या भीषण अपघातात चार निष्पापांचा नाहक बळी गेला. दोन लोकल वळणार एकसाथ आल्याने, दरवाज्यात उभे असलेले लोक एकमेकांना घासले गेले. यादरम्यान, दोन्ही लोकलमध्ये असलेल्या जागेत ते खाली पडले आणि या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले. आहेत. या घटनेला तीन दिवस उलटत नाही, तोवर पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली-दहिसर दरम्यान एक तरुण चालत्या लोकलमधून खाली पडल्याचं समोर आलं आहे.

हा तरुण काही कामानिमित्त बाहेर जात होता. तो रेल्वेच्या दरवाज्यात उभा असताना त्याचा अचानक तोल गेल आणि चालत्या लोकलमधून तो खाली पडला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली-दहिसर दरम्यान ही घटना घडली. कर्तव्यावर असलेल्या गार्डनं याची माहिती जीआरपी आणि आरपीएफला दिली. त्यानंतर जखमी तरुणाला तिथे उपस्थित असलेल्या हमालाच्या मदतीने प्लॅटफॉर्मवर आणलं. रुग्णवाहिकेनं त्याला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. संबधित तरुणाला जेव्हा रुग्णालयात दाखल केलं तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, त्या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिलीय.

मुंब्य्रात लोकल अपघाताचा आणखी एक बळी

दरम्यान, मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकलच्या अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. काल सकाळी दोन लोकल एकमेकांना घासल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच मुंब्रा स्थानकात लोकलचा आणखी एक अपघात झाला आहे. सोमवारी संध्याकाळी मुंब्रा स्टेशनवर झालेल्या लोकल अपघाताने खळबळ उडाली आहे. मुंब्रा ते ठाणे दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनने एका ३० वर्षीय महिलेला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मृत महिला, मीना प्रदीप बोडपडे (वय ३०), रेतीबंदर मार्गावरील रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना हा अपघात घडला. मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या या मार्गावर ट्रॅक ओलांडणे धोकादायक असल्याचे यापूर्वीही अनेकदा सिद्ध झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, मीना ट्रॅक ओलांडत असताना वेगाने येणाऱ्या लोकल ट्रेनने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या आणि काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली, मात्र तोपर्यंत त्यांचे प्राण गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT