Aditya Thackeray On Bmc Street Furniture Scam Saam Tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray News: 'अद्यापही उत्तर मिळालं नाही', स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचं पुन्हा पालिका आयुक्तांना पत्र

Aditya Thackeray On BMC Scam: 'अद्यापही उत्तर मिळालं नाही', स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचं पुन्हा पालिका आयुक्तांना पत्र

Satish Kengar

Aditya Thackeray On Bmc Street Furniture Scam:

मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र लिहिलं आहे.

आपल्या पत्रात ते म्हणाले आहेत की, ''मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या स्ट्रीट फर्निचर घोटाळा या संदर्भात मी आपणास पत्राद्वारे काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची उत्तर अद्यापही मला तुमच्याकडून मिळाली नाही.''

आपल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ''आमदार या नात्याने मला संविधानाने दिलेला अधिकार आहे. उत्तर आपल्याकडून वेळेत अपेक्षित आहेत.'' (Latest Marathi News)

या पत्रातून त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

१. स्ट्रीट फर्निचर घोटाळाच्या चौकशीची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे?

२. आतापर्यंत कोणाकोणाची चौकशी करण्यात आली आहे?

३. आतापर्यंत या भ्रष्ट्राचारी काँट्रॅक्टरना किती निधी वितरित झाला आहे व अजुन किती निधी वितरित होणार आहे?

४. या चौकशीचा अहवाल कधी पर्यंत येणार आहे?

याआधी आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल यांनाही याप्रकरणी पत्र लिहिलं होतं. यात ते म्हणाले होते की, रस्त्यावरील फर्निचर घोटाळा रोखण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा आणि याची निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी लोकायुक्तांमार्फत चौकशी करावी. अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

त्यांनी पत्रात लिहिलं होतं की, 10 मे 2023 रोजी आमच्या बैठकीनंतर आम्ही विविध व्यासपीठांवर हा मुद्दा मांडत राहिलो. बीएमसी राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या प्रतिनिधींना उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे. शेवटी विशेषाधिकार प्रस्ताव पर्यायाचा शोध घेतल्यावर पालिका आयुक्तांनी डीएमसीला माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस

Elvish Yadav: 'मी आणि माझे कुटुंब...'; गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Police Attacked : मोर्चाला हिंसक वळण, पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, नेमकं काय घडलं? VIDEO

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार! अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT