आज आम्ही तुम्हाला अशा पाच सरकारी योजनांची माहिती संगणरा आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता विसराल.
सध्याच्या काळात आपल्या मुलांचे आर्थिक नियोजन करणे अधिक गरजेचे झाले आहे. सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जातात. ज्यात गुंतवणूक करून भविष्यात पैशाची कमतरता दूर करता येते. (Utility News)
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही अल्पबचत योजनेंतर्गत येते. मुलींना जन्मापासून ते 10 वर्षे वयापर्यंत खाते उघडता येते. या योजनेत पालक आपल्या मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. यामध्ये 250 रुपयांमध्ये खाते उघडता येते. आर्थिक वर्षात तुम्ही यामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये सध्या 8 टक्के व्याज दिले जात आहे. मुलीच्या 21 वयाच्या वर्षांनंतर तुम्ही संपूर्ण रक्कम काढू शकता. (Latest Marathi News)
बालिका समृद्धी योजना
बालिका समृद्धी योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोकांना त्याचा लाभ दिला जातो. ही योजना मणिपूर सरकार चालवते. या अंतर्गत 300 रुपये ते 1000 रुपयांपर्यंतची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.
माझी कन्या भाग्यश्री योजना
माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मुलीच्या जन्मावर शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. कुटुंबातील दोन मुलींना हा लाभ मिळू शकतो, परंतु दोनपेक्षा जास्त मुली असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. तसे असल्यास तुम्ही या योजनेत अर्ज करू शकता.
माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन देण्याची राष्ट्रीय योजना केंद्र सरकारने 2008 मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत आठवी उत्तीर्ण व नववीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींना लाभ दिला जातो. केंद्र सरकार मुलींच्या नावे 3000 रुपये जमा करते आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम व्याजासह दिली जाते.
महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, उत्तराखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगालसारख्या अनेक राज्य सरकारे मुलींसाठी योजना चालवतात. या योजनांमध्ये जन्मापासून लग्नापर्यंतचा खर्च दिला जातो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.