Share Market Closing: शेअर बाजाराने केले मालामाल! निफ्टी 20,000 पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात कमावले 3 लाख कोटी रुपये

Share Market Closing Update: शेअर बाजाराने केले मालामाल! निफ्टी 20,000 पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात कमावले 3 लाख कोटी रुपये
Share Market Closing Update in Marathi
Share Market Closing Update in MarathiSaam Tv
Published On

Share Market Closing Update in Marathi:

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सोमवारचा दिवस मालामाल करणारा ठरला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच निफ्टी 50 ने 20000 चा मोठा टप्पा पार करण्यात यश मिळवलं आहे. तर NSE निर्देशांक निफ्टीने सोमवारी इंट्राडे उच्चांक 20,008.15 अंकांवर गाठला.

निफ्टीची ही आजपर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. बाजार व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 19,996.35 वर बंद झाला. याआधी NSE चा सर्वकालीन उच्चांक 19,991.85 अंकांवर होता. NSE या वर्षी 20 जुलै रोजी ही पातळी गाठली होती.

Share Market Closing Update in Marathi
PF News: 72 तासांत तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात पीएफचे पैसे, जाणून घ्या कसे...

सेन्सेक्सने पुन्हा 67,000 पार

निफ्टीच नाही तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्येही सोमवारी वाढ झाली. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 67,172.13 वर पोहोचला होता. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 528 अंकांच्या वाढीसह 67,127.08 वर बंद झाला. (Latest Marathi News)

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराच्या दमदार कामगिरीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. गुंतवणूकदारांनी सोमवारी 3 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Share Market Closing Update in Marathi
Investment Tips: 'या' सरकारी योजनेत मिळत आहे FD पेक्षा जास्त परतावा, गुंतवणुकीवर मिळणार सर्वाधिक व्याज

G20 मुळे बाजारात तेजी

G20 मध्ये भारताच्या यशामुळे आज बाजारात तेजीचा कल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिओजित फायनान्शिअलशी संबंधित व्हीके विजय कुमार यांनी सांगितलं की, सर्व अडचणी असूनही ज्या प्रकारे भारताला दिल्ली घोषणापत्रासाठी पाठिंबा मिळाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात भारतीय बाजाराबद्दल विश्वास वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com