India Alliance News: इंडिया आघाडीत जागावाटप आणि उमेदवार कधी होणार निश्चित? लालूंनी सांगितली तारीख, दिल्लीत होणार बैठक

India Alliance Latest News: इंडिया आघाडीत जागावाटप आणि उमेदवार कधी होणार निश्चित? लालूंनी सांगितली तारीख, दिल्लीत होणार बैठक
India Alliance Latest News
India Alliance Latest NewsSaamtv

India Alliance Latest News:

इंडिया आघाडीत आता जागावाटप आणि उमेदवारांची निवड होणार आहे. याची प्रक्रिया 12 आणि 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारी झारखंडमधील देवघर येथील बाबा बैद्यनाथ धाम मंदिरात प्रार्थना केल्यानंतर लालूंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भारत आघाडी लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आता उमेदवार निवडीचे काम सुरू केले जाणार आहे.

ते म्हणाले की, 28 पक्षांच्या इंडिया आघाडीच्या निमंत्रकांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 13 सप्टेंबर रोजी समन्वय समितीची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला लालूंचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित राहणार आहेत.

India Alliance Latest News
Government Schemes: मुलींसाठी जबरदस्त 5 सरकारी योजना; शिक्षणापासून लग्नापर्यंत, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही...

यावेळी लालूंनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, त्यांनी बाबा बैद्यनाथ यांच्याकडे इतके संख्याबळ मागितले की ते एनडीएला सत्तेतून बेदखल करू शकतील. (Latest Marathi News)

ते म्हणाले की, निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधान मोदींनी जनतेला फसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु नरेंद्र मोदींचा बजरंगबलीचा नारा कर्नाटकात चालला नाही. देशात महागाई, गरिबी आणि बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. केंद्र सरकारला बाबासाहेबांचे संविधान विकायचे आहे, असा आरोप लालूंनी केला.

India Alliance Latest News
Sanjay Biyani News: संजय बियाणी हत्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश, शूटर दिपक रांगाला केली अटक

भाजप हा भांडवलदारांचा पक्ष असल्याचे म्हणत लालूप्रसाद यादव म्हणाले की, भाजप देशाचे विभाजन करून लोकांमध्ये मतभेद निर्माण करत आहे. आता भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सत्तेवरून हटवण्याची वेळ आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com