BMC Homes Lottery 2025 Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी जाहीर, कधी, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

BMC: मुंबईमध्ये महानगर पालिकेकडून तब्बल ४२६ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ही लॉटरी निघणार आहे. त्यामुळे अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Priya More

Summary -

  • बीएमसीकडून ४२६ घरांसाठी लॉटरीची घोषणा करण्यात आली

  • अर्ज प्रक्रिया १६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होईल

  • पात्र अर्जदारांची यादी १८ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल

  • अंतिम सोडत २० नोव्हेंबर रोजी पार निघेल

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये हक्कांच्या घराचे असावे असे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण मुंबईकरांना महापालिकेकडून दिवाळी भेट मिळणार आहे. मुंबई महापालिकेकडून ४२६ सदनिकांची विक्री केली जाणार आहे. या प्रक्रियेला १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. यासाठी मुंबईकर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आणि लॉटरी कधी निघणार हे आपण जाणून घेणार आहोत...

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होत आहे. ही मुंबईकरांसाठी खास दिवाळीची भेट ठरणार आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०)(ब) अन्वये प्राप्त ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी महापालिकेकडून १६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. नागरिकांना https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येतील. अर्ज १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून उपलब्ध होतील. तर अंतिम सोडत २० नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल.

पात्र अर्जदारांची यादी १८ नोव्हेंबर आणि सोडतीचे निकाल २१ नोव्हेंबर रोजी वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील. घरांच्या सोडतीसंदर्भात माहिती आणि मदतीसाठी ०२२-२२७५४५५३ या क्रमांकावर किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ वर अजून एक गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT